Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुझ्यात जीव रंगला! राणादा पाठकबाईंना उचलून चढला जेजूरीच्या पायऱ्या.. Video व्हायरल

Hardeek Joshi and Akshya Deodhar at Jejuri: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तुमच्या लाडक्या राणा दा आणि पाठक बाईंची. सध्या त्यांनी जेजुरीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

तुझ्यात जीव रंगला! राणादा पाठकबाईंना उचलून चढला जेजूरीच्या पायऱ्या.. Video व्हायरल

Hardeek Joshi and Akshya Deodhar at Jejuri: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राणा दा आणि पाठक बाईंच्या जेजुरीच्या दर्शनाची. सध्या ते दोघंही खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला पोहचले असल्याचे समजते आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात ते दोघंही स्पॉट झाले आहे. यावेळी हार्दिक जोशीनं पत्नी अक्षय़ा देवधरला उचलून धरत मंदिरात प्रवेश केला आहे. 2016 साली आलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून ते दोघं घराघरात पोहचले होते. त्यामुळे त्यांची तेव्हा बरीच चर्चा रंगली होती. पुढील पाच एक वर्षे तरी ही मालिका सुरू होती. ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चाही अनेकदा होताना दिसत होत्या. शेवटी अखेर लग्न करून त्यांनी चाहत्यांना सरप्राईज केले होते.

आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ''येळकोट येळकोट जय मल्हार.....'' असं कॅप्शन देत हार्दिक जोशीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या चाहत्यांना या व्हिडीओची चांगलीच क्रेझ वाटते आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, अक्षयाला उचलून नेत हार्दिक सपत्निक मंदिरात प्रवेश केला आहे. यावेळी त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे हार्दिकचेही यावेळी कौतुक होताना दिसते आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे असे अनेक व्हिडीओ त्या दोघांच्या चाहत्यांना पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - TMKOC मालिकेतून अजून एक अभिनेत्री बाहेर, म्हणाली, ''माझं नातं संपलंय...''

यावेळी त्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले आणि भंडाऱ्याची उधळणही केली. सोबतच त्या दोघांनी मिळून शिवाची पूजादेखील केली. त्यानंतर हार्दिकनं खंडोबाची 42 किलो खांदा तलवार उपसली. मंदिरात एक भक्तही यावेळी तलवार उचलताना दिसतो. यावेळी मंदिराबाहेर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांचीही गर्दी पाहायला मिळाली होती. यावेळी हार्दिकनं पांढरा कुर्ता तर अक्षयानं केशरी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2 डिसेंबर 2022 रोजी ते दोघंही विवाहबंधनात अडकले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. त्यातून आता त्यांच्या या फोटोंनी त्यांच्या प्रेमाची पुन्हा ेएकदा नव्यानं झलक पाहायला मिळाली आहे. 

Read More