Harry Potter Fame Jessie Cave Joins OnlyFans : 'हॅरी पॉटर' या लोकप्रिय असलेल्या चित्रपटाच्या सीरिजची लोकांमध्ये आजही क्रेझ आहे. हॅरी पॉटर या चित्रपटात लॅव्हेन्डर ब्राऊन ही भूमिका साकारणारी जॅसी केव्ह अभिनेत्री आता चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे तिनं खुलासा केला आहे की तिनं कर्जातून बाहेर येण्यासाठी OnlyFans जॉईन केलं आहे. त्याशिवाय तिनं आपला बचाव करताना स्पष्टीकरण दिले आहे. मी कुठलाही अश्लील कंटेन्ट पोस्ट करणार नाही. याउलट केवळ मादक वाटतील असे शरीराच्या वेग-वेगळ्या भागांचे फोटो पोस्ट करेन असं ती म्हणाली.
Before We Break Up या तिच्या पॉडकास्टमध्ये तिनं पुढे म्हटलं की "हे विशेषत: त्या लोकांसाठी आहे ज्यांना केसांबद्दल आवड किंवा केसांना घेऊन ते फेटिश आहेत. मी इन्स्टाग्रामवर माझ्या केसांचे बरेच व्हिडिओ शेअर करते आणि हे मी बऱ्याच काळापासून असं करत आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मला नेहमीच त्यावरून प्रतिक्रिया मिळतात. त्या कधीही अश्लील किंवा घाणेरड्या नसतात. पण, मला केसांबद्दल खूप आवड आहे आणि मग मी विचार केला, 'ठीक आहे, मी त्यात काहीतरी खूप चांगलं करतो."
पुढे जॅसीनं सांगितलं की 'आता माझा यात नेमका हेतू काय आहे? माझ्या घरातील सगळ्या गरजा पूर्ण होणं, त्यानंतर घरात लागणारे वॉलपेपर, नवीन छप्पर बनवणं आणि इतर काही गोष्टी. माझं उदिष्ठ? तर माझ्यावर असलेल्या कर्जापासून सूटका. माझं उदिष्ठ? स्वत:ला सामर्थ्य देणं. तर ज्या लोकांना वाटायचं की मी खूप चांगली आहे त्यांना मी तशी नाही हे सिद्ध करून दाखवायचं? असं काहीतरी करत वेळ घालवायचा जे मी आधी कधीच केलं नव्हतं : स्वतःवर प्रेम.' त्यामुळे आता जॅसी नेमकं काय शेअर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : कोण आहे Samantha Ruth Prabhu चा रुमर्ड बॉयफ्रेंड? डेटिंगच्या चर्चांमध्ये समोर आला नवा फोटो
जॅसीचं लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव अल्फी ब्राउन आहे. त्या दोघांना 4 मुलं आहेत. त्यात 3 मुलं आणि एक मुलगी आहे.