Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा, Corona ला विसरून हरयाणवी डान्सरला पाहण्यासाठी तोबा गर्दी; स्टेजवर तिचाच जलवा

या व्हिडीओला जबरदस्त पसंतीही मिळताना दिसत आहे

पाहा, Corona ला विसरून हरयाणवी डान्सरला पाहण्यासाठी तोबा गर्दी; स्टेजवर तिचाच जलवा

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सपना चौधरीपासून ते अगदी आर. सी. उपाध्यायपर्यंत बऱ्याच हरयाणवी डान्सर्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओला जबरदस्त पसंतीही मिळताना दिसत आहे. स्थानिक कलाकारांना वाव देत त्यांची कला या निमित्तानं सर्वांपर्यंत पोहोचत आहे. (haryanvi dancer RC Upadhyay dance video )

फक्त कलाच नव्हे, तर कलाकारांनाही या निमित्तानं एका मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणं शक्य होत आहे. सध्या युट्यूबच्या माध्यमातून गाजणाऱ्या कलाकारंपैकीच एक नाव म्हणजे आर.सी. उपाध्याय (R.C Upadhyay) हिचं. 

का आली सपना चौधरीवर म्हशींना अंघोळ घालण्याची वेळ?

 

दर दिवसाआड तिचे अनेक व्हिडीओ कमालीचे व्हायरल होत असतानाच त्यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्टेजवर तिचाच जलवा पाहायला मिळत असून, कोरोनाचं संकट विसरुन तिचा डान्स पाहण्यासाठी बघ्यांनी तोबा गर्दी केल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. 

तिच्या मादक अदा आणि नृत्यशैली पाहून पाहणारे अवाक् झाल्याचं इथं दिसत आहे. आर.सीच्या व्हिडीओ हल्ली व्हायरल होण्याचं प्रमाण वाढल्यामुळं तिची तुलना सपना चौधरी हिच्याशी होऊ लागली आहे. पण, इथं लक्षात घेण्याजोगी बाब ही, की या दोन्ही डान्सर्सची शैली ही पूर्णपणे वेगळी असून, त्यांना त्याच तोडीस प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. 

Read More