Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hate Story 4 या सिनेमातील गाणं रिलीज

उर्वशी रौतेलाचा बोल्ड सिनेमा हेट स्टोरी 4 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

Hate Story 4 या सिनेमातील गाणं रिलीज

मुंबई : उर्वशी रौतेलाचा बोल्ड सिनेमा हेट स्टोरी 4 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

आता या सिनेमातील आशिक बनाया आपने या गाण्यावर तनुश्री दत्ताला थिरकताना आपण पाहिले आहे. आता हेस्ट स्टोरी 4 मध्ये या गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे. आणि आता या सिनेमांत उर्वशीचा हॉट अदा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात उर्वशी अतिशय बोल्ड अवतारात दिसणार आहे.

ट्रेलरवरून याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. पण आता उर्वशीचा ट्रेलरपेक्षाही बोल्ड अंदाज समोर आला आहे. होय, मेकर्सने ‘हेट स्टोरी4’चे पहिले गाणे रिलीज केलेय. या गाण्यात उर्वशी कधी नव्हे इतकी बोल्ड दिसतेय. ‘आशिक बनाया आपने’ असे या गाण्याचे शब्द आहेत. आता हे गाणे यापूर्वीही तुम्ही ऐकलेय, हे आम्ही सांगायला नकोच. 

आधी हा चित्रपट २ मार्चला रिलीज होणार होता. पण आता तो ९ मार्चला रिलीज होणार आहे. उर्वशीसोबत अभिनेता करण वाही यात लीड रोलमध्ये आहे. याशिवाय एक नवा चेहराही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  पंजाबी अभिनेत्री इहाना ढिल्लन या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. सूरज पांचोली आणि गुरमीत चौधरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Read More