Marathi News> मनोरंजन
Advertisement

गरोदरपणाविषयी कळताच अशी होती कल्कीच्या पूर्वाश्रमीच्या पतीची प्रतिक्रिया

अनुराग कश्यप आणि कल्की यांचं नातं फार काळ टिकलं नाही, पण.... 

गरोदरपणाविषयी कळताच अशी होती कल्कीच्या पूर्वाश्रमीच्या पतीची प्रतिक्रिया

मुंबई : 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातून 'अदिती'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्की केक्ला सध्या तिच्या आयुष्यातील खास क्षण अनुभवत आहे. कल्की आणि तिचा प्रियकर Guy Hershberg हे दोघंही त्यांच्या या नात्यात एका नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 

नुकतंच एका मुलाखतीत खुद्द कल्कीनेच याविषयीची माहिती देत आपण, पाच महिन्यांचं गरोदर असल्याचा उलगडा केला. या सुखावह उलगड्यानंतर अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. गरोदरपणात अतिशय आनंदात असणाऱ्या कल्कीने तिच्या होणाऱ्या बाळासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मग, ते त्या बाळाच्या जन्माविषयी असो किंवा त्याच्या नावाविषयी. 

fallbacks

कल्की गरोदर असल्याचं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीला म्हणजेच निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप याला कळलं तेव्हा यावर त्याची काय प्रतिक्रिया होती, याविषयीसुद्धा तिने सांगितलं. एकेकाळी विवाहबंधनात अडकलेल्या कल्की आणि अनुराग यांचं नातं काही फार काळ टीकलं नाही. अखेर त्यांनी या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर त्यांच्यातील मैत्री मात्र कायम राहिली. याचाच प्रत्यय आता येत आहे. जेव्हा गरोदर कल्कीसाठी अनुरागनेही शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या गरोदरपणाविषयी अनुरागची प्रतिक्रिया काय होती, हे सांगत त्याने सर्वप्रथम आपलं या पालकांच्या वर्तुळात स्वागत केल्याचं तिने सांगितलं. 'कधीही काहीही मदत लागली तर मला फोन कर', असं सांगत आपण आजही एक मित्र म्हणून तुझ्यासोबत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिल्याचं कल्कीने सांगितलं. आलिया म्हणजेच अनुरागची मुलगी आणि आपला भाऊ ओरिएल यांना मोठं होताना पाहून आपणही पालकत्वाचा अनुभव घेतल्याचं कल्कीने सांगितलं. एका अर्थी या जबाबदारीसाठी ही अभिनेत्री तयार आहे, असंच म्हणावं लागेल. 

Read More