Marathi News> मनोरंजन
Advertisement

'त्याने माझ्या B#*t ला हात लावला अन् माझ्या शर्टमध्ये...'; या अभिनेत्रीसोबत सर्वोच्च न्यायालयात विनयभंग

अलिकडेच एका अभिनेत्रीने तिच्यासोबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या लैंगिक शोषणाबद्दलची वेदनादायी कहाणी सांगितली. अभिनेत्री म्हणाली की, जेव्ही ती विद्यार्थी होती तेव्हा एका वरिष्ठ वकिलाने तिच्या शर्टमध्ये...  

'त्याने माझ्या B#*t ला हात लावला अन् माझ्या शर्टमध्ये...'; या अभिनेत्रीसोबत सर्वोच्च न्यायालयात विनयभंग

Nimrit Kaur Ahluwalia was sexually Molested in Supreme Court : सर्वसामान्य महिलांना कधी ना कधी लैंगिक छळाचा सामना करावा लागला आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल एक अभिनेत्रीदेखील या लैंगिक छळाची शिकार झाली आहे.  टीव्ही अभिनेत्री 'छोटी सरदारनी' फेम निमृत कौरने असाच तिच्या आयुष्यातील वेदनादायी आणि धक्कादायक घटनेबद्दल खुलासा केला आहे. निमृतने खुलासा केला की, तिच्या कॉलेजच्या काळात सर्वोच्च न्यायालयात एका पुरूषाने तिचा विनयभंग केला होता. निम्रतने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कायद्याची विद्यार्थिनी असताना तिला सर्वोच्च न्यायालयात लैंगिक छळाचा सामना करावा लागला. 

'त्याने माझ्या B#*t ला हात लावला अन् माझ्या शर्टमध्ये...'

निम्रत कौरने हाऊसरफ्लाय या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या भूतकाळातील धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, जेव्हा ती कायद्याची विद्यार्थिनी होती तेव्हा तिला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता. अभिनेत्री म्हणाली, "माझाही छेडछाड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वरिष्ठ वकिलाने माझा विनयभंग केला आहे. त्यावेळी मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात होते. मी फक्त एका सुनावणी ऐकण्यासाठी तिथे गेले होते."

अभिनेत्री म्हणाली, "आम्ही सर्वजण कोर्ट रूममध्ये बसलो होतो . सुनावणी सुरू होती आणि न्यायाधीश समोर बसले होते. आजूबाजूला खूप गर्दी होती आणि त्या माणसाने छेडछाड केलेली मी एकटी नव्हती. माझ्या आधी, त्याने एका महिला वकिलाशीही गैरवर्तन केले होते. त्याच दिवशी आणि त्याच वेळी. मी कोर्ट रूममध्ये सुनावणी ऐकत असताना मला कोणाचा तरी हात माझ्या पाठीला स्पर्श झाल्याचे जाणवले. त्यावेळी मला वाटले की कदाचित मी जास्त विचार करत आहे. तिथेही खूप गर्दी होती. मी मागे वळून पाहिले आणि पाहिले की तो माणूस माझ्याकडेच पाहत होता."

अभिनेत्रीने सांगितले की तिने भीतीमुळे तिची जागा बदलली होती, पण तो माणूस तिथेही तिच्या मागे गेला. त्याने त्याच्या हातांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याने अभिनेत्रीच्या नितंबावर हात ठेवला आणि तिच्या शर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. मग एका महिला वकिलाने तिला मदत केली. हे सर्व सांगत असताना, अभिनेत्री खूपच भावनिक झाली होती. 

Read More