Marathi News> मनोरंजन
Advertisement

Race 3 - हिरिए गाण्याच्या मेकिंग व्हिडिओमध्ये सलमान - जॅकलीनची धम्मालमस्ती

येत्या ईदला सलमान खानचा 'रेस 3' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Race 3  -  हिरिए गाण्याच्या मेकिंग व्हिडिओमध्ये सलमान - जॅकलीनची धम्मालमस्ती

मुंबई : येत्या ईदला सलमान खानचा 'रेस 3' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटातील दोन गाणी चाहत्यांच्या भेटीला आली आहेत. सेल्फिश हे रोमॅन्टिक तर हिरिए हे एक खास सलमान खान स्टाईलचं गाणं आहे. 

हिरिए  गाण्याचा धम्माल व्हिडिओ 

जॅकलीन फर्नांडीस आणि सलमान खान या दोघांवर हिरिए हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं डान्सिंग नंबर आहे. त्यामध्ये जॅकलीनच्या पोल डान्सनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. जॅकलीन आणि सलमान खान कडून खास डान्स स्टेप्स करून घेताना मज्जामस्तीदेखील करण्यात आली आहे. 

 

तगडी स्टारकास्ट 

सलमान खानसोबत रेस 3 या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडीस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शहा, साकीब सलीम अशी तगडी स्टारकास्ट  या चित्रपटामध्ये झळकणार आहे. येत्या 15 जूनला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.  

Read More