रिअॅलिटी शो खरंच रिअल असतात की स्क्रिप्टेड असतात यावरुन नेहमीच चर्चा रंगलेली असते. सेलिब्रिटी, निर्माते, दिग्दर्शक नेहमीच हा दावा फेटाळत असतात. पण नुकताच हेमा मालिनी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात यावर जवळपास शिक्कामोर्तबच झालं आहे. हेमा मालिनी यांनी 'इंडियन आयडल' शोमध्ये हजेरी लावली असता, त्यांच्या हातात संपूर्ण शोची स्क्रिप्ट होती. फोटोमध्ये हेमा मालिनी यांच्या हातात ही स्क्रिप्ट दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी शो स्क्रिप्टेड असते हे जाहीर करुन टाकलं आहे.
शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये हेमा मालिनी यांचे स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. होळीच्या निमित्ताने आयोजित विशेष एपिसोडसाठी हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती. हेमा मालिनी यांनी एपिसोडमध्ये सफेद रंगाची साडी परिधान केली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला हा एपिसोड ऑन एअर गेला होता. फोटोमध्ये हेमा मालिनी हसत असून कोणाशी तरी बोलत आहेत. यावेळी त्यांच्या हातात स्क्रिप्ट होती.
त्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं होतं की, "हेमाजी मथुरा स्टाईल होळीचं वर्णन करतील. प्रियांगशू याला लाठी मार होळी म्हणतात....".
हा क्लिप शेअर करताना लिहिण्यात आलं आहे की, "रिअॅलिटी शोज. गेल्या आठवड्यातील इंडियन आयडलच्या एपिसोडची सविस्तर स्क्रिप्ट हातात धरलेल्या हेमा मालिनीच्या या फ्रेमवर मी अडखळलो. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना अजूनही हे शो 'खरे' वाटतात".
एका युजरने म्हटलं आहे की, “हे कायमच स्क्रिप्टेड होता. बहुतेक रिअॅलिटी शो... अगदी काही प्रमाणात बिग बॉस देखील,” तर दुसऱ्याने म्हटले, “तर रिअॅलिटी शो कसे बनवले जातात असं वाटतं? त्यात काही नवीन नाही. त्यांना सर्वकाही नियोजन करावे लागते. ते अतिरिक्त घटक आणि एक तासाचा एपिसोड कसा बनवायचा.”
दुसऱ्या व्यक्तीने अशी प्रतिक्रिया दिली की, “हे खूप लाजिरवाणे आहे.” एका वापरकर्त्याने असेही म्हटले की, “मला एकदा एका डान्स रिअॅलिटी शोच्या बॅकस्टेजवर काम करावे लागले होते, आणि सर्वकाही अगदी भारती सिंगचे कॉमिक टायमिंग आणि पंचलाइन्स आणि (गोविंदा शोमध्ये जज म्हणून आला होता तेव्हा) त्यामुळे तो देखील त्याला हे गाणे किती आवडले आणि स्पर्धक गोविंदाने त्यावर नाचावे अशी इच्छा करत होता, सर्वकाही स्क्रिप्टेड होते.”