मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक कपल म्हणून ओळखले जाणार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच लग्न करणार असल्याची अगदी अधिकृत माहिती हाती आली आहे. फिल्मफेअरमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे लग्न 20 नोव्हेंबरला इटलीमध्ये हे लग्न होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या लग्नाला फक्त 30 अगदी जवळची मंडळी उपस्थित असणार आहे. या बातमीवर ज्येष्ठ अभिनेता कबीर बेदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
हे ट्विट करताना कबीर बेदी यांनी दीपिका - रणवीरला टॅग केलेलं आहे. तसेच त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अद्याप दीपिका आणि रणबीरने याबाबत कोणताही रिप्लाय केलेला नाही.
Great couple! Great locale in Italy! Great event!
— KABIR BEDI (@iKabirBedi) August 13, 2018
Wishing @RanveerOfficial and @deepikapadukone a wonderful wedding, and a lifetime of happiness. https://t.co/pPY6gBol8Z
फिल्मफेअरमध्ये आलेल्या या बातमीनुसार दीपिका - रणवीर यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे. हे लग्न इटलीच्या लेक कोमो येथे होणार आहे. या लग्नात मोजून फक्त 30 लोकं उपस्थित असणार आहेत. इटलीत लग्न पार पडल्यानंतर ही मंडळी मुंबईत ग्रँड रिसेप्शन देणार असल्याचं सांगितलं जात आहे.