Marathi News> मनोरंजन
Advertisement

हिमेश रेशमियाने Ranu Mondal यांना दिलं खास वचन, कारण ऐकून व्हाल थक्क

हिमेशने रानू यांना कोणतं वचन दिलं?   

हिमेश रेशमियाने Ranu Mondal यांना दिलं खास वचन, कारण ऐकून व्हाल थक्क

मुंबई : पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थनकाबाहेर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. 'एक प्यार का नगमा है' गाण्याने त्यांना एक वेगळी ओळख दिली. इंटरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू आता प्रसिद्ध गायकांच्या यादीत सामाविष्ट झाल्या आहेत. पण गेल्या कही दिवसांपासून त्या कोठे आहेत? काय करतात? याबद्दल काही माहिती नाही. पण सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एका खास गोष्टीचा खुलासा केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी गायक हिमेश रेशमियाने दिलेल्या त्या वचनाबद्दल सांगितलं आहे. 

दरम्यान एका यूट्यूबरने रानू यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत हिमेशने रानू यांना मुंबईत फ्लॅट देण्याचं वचन दिलं होतं.  यूट्यूबरने रानू यांना विचारलं मुंबईत तुमचं काय आहे? या प्रश्नाचं उत्तर देत रानू म्हणाल्या, 'हिमेश यांनी सांगितलं होतं की मुंबईत फ्लॅट खरेदी करून देईल. कारण ते जेव्हा मुंबईत बोलावतात तेव्हा काही दिवस तिथे राहावं लागतं..'

पुढे त्या म्हणाल्या, हिमेश मला मुंबईत फ्लॅट देणार आहेत आणि आम्ही मिळून शूट करणार आहोत. शिवाय रानू यांना मुंबईतील पदार्थ देखील फार आवडतात असं देखील त्या म्हणाल्या आहेत. हिमेशच्या या वचनानंतर रानू यांचं सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे स्वप्न पूर्ण होणार, असं म्हणायला काही हरकत नाही.

दरम्यान, रानू मंडल यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना रिअॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. हिमेश रेशमिया हा शो जज करत होता. 'हॅप्पी हार्डी एण्ड हीर' या चित्रपटात हिमेश रेशमियाने रानू यांच्यासोबत काही गाणी स्वरबद्द केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या कोलकाता येथे राहत आहेत.

Read More