Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री हिना खानला अशा अवस्थेत पाहून तिच्या आईला बसला धक्का; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री हिना खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या आईला तिला अशा अवस्थेत पाहून जबर धक्का बसतो.

अभिनेत्री हिना खानला अशा अवस्थेत पाहून तिच्या आईला बसला धक्का; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : हिना खानचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. हिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नेहमीच अभिनेत्री तिच्या चाहत्यांसाठी तिचे काही फोटो व्हिडीओ शेअर करत असते.  हिना खानने नुकताच तिच्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती लंगडत चालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हिना खान गुपचूप तिच्या घरी जाते आणि यावेळी हिना तिच्या आईला अचानक भेटायला जाते. तिच्या आईसाठी हे एक सरप्राईज असतं. 

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हिना खान कॅमेरासमोर येते आणि शांत राहण्याचे एक्सप्रेशन देते.  नंतर ती दुसऱ्या ठिकाणी लपते. दाराच्या मागून बाहेर येताना, ती घराभोवती पाहते की तिची आई तिला दिसत नाही. मग ती सोफ्यावर  जाऊन बसते. आता हिना खान तिला आई म्हणते. हिनाची आई आतून बाहेर येते. बाहेर आल्यावर आपल्या मुलीला सोफ्यावर बसलेलं पाहून ती रडायला लागते.

हिना खानला मिठी मारून तिची आई रडू लागते. तेव्हाच हिना खान आरामात बोलते मम्मा, मला वेदना होत आहेत. अशा स्थितीत आई हिनाला दुरून पाहते आणि काळजीने विचारते की काय झालंय. मला सांग, तू बरी आहेस ना, सांग तर काय झालंय कसं लागलंय तुला? हिना खानच्या आईचा उच्चार पूर्णपणे काश्मिरी आहे, यावेळी तिचा आवाज ऐकायला खूप गोड वाटतो.

हा व्हिडीओ शेअर करत हिनाने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''माझी आई खूप लवकर झोपते.. त्यामुळेच तिला मी येत असल्याचे सांगितलं नाही, मी रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आली मी घरात आहे हे तिला माहितही नव्हतं. मी सकाळी तिला उठल्यावर सरप्राईज केलं आणि तिची रिएक्शन पाहा. तिची अनमोल प्रतिक्रिया..माझी भोळी आई. माझा आवाज ऐकून ती आधी दारात गेली. माझ्या पायाची काळजी करू नकोस.. सगळं ठीक आहे''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हिना खानचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हिनाच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलंय की, मा मा होती है. तर अजून एकाने लिहीलंय की, स्वत:ला लागल्यावर असे कपडे कोण घालतं? तर अजून एकाने लिहीलंय, सुंदर चेहऱ्याच्या मुलींच्या पायाची नखं कुरूप का असतात. हिना तुला तुझ्या पायाच्या बोटांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण, जी नखं तुटलेली असतात. ती विचीत्र प्रकारे वाढतात. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते तिच्या व्हिडीओवर करत आहेत. 

Read More