Marathi News> मनोरंजन
Advertisement

आतातरी माझं वय कमी करा; ज्येष्ठ अभिनेत्रीचा गुगलकडे आग्रह

एक काळ गाजवणाऱ्या..... 

आतातरी माझं वय कमी करा; ज्येष्ठ अभिनेत्रीचा गुगलकडे आग्रह

मुंबई : सोशल मीडियाचा वापर आपआपल्या परिने करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. कोणी, नुसतेच फोटो पोस्ट करण्यासाठी, कोणी मित्रमंडळींच्या संपर्कात राहण्यासाठी तर कोणी इतर काही कारणांनी या माध्यमाचा वापर करतं. सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडिया हाताळण्यात तसे आघाडीवर. वयाची कोणतीही अट नसणाऱ्या या माध्यमावर आपल्या प्रत्येक पोस्टने लक्ष वेधणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. 

'बधाई हो', 'पंगा' या चित्रपटातून दमदार अभिनय सादर करणाऱ्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या नीना गुप्ता या त्यांच्या जीवनशैलीसाठीही ओळखल्या जातात. शिवाय काही मुद्द्यावर येणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया, मतं हे सारंही कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतं. 

सध्या नीना, त्यांच्या नव्या लूकसाठी प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांच्या या लूकविषयी सांगावं तर, भल्याभल्यांचं लक्ष वेधणारा असाच हा लूक आहे असं म्हणायला हरकत नाही. Aging fine like wine ही ओळ सार्थ ठरवणाऱ्या नीना गुप्ता यांनी नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये त्या सुरेख आणि साजेशा अशा शॉर्ट हेअर लूकमध्ये दिसत आहेत. 'गुगल वालों अब तो मेरी उम्र कम करके लिख लो', असं कॅप्शन लिहित त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. सोबत एका खास व्यक्तीचे आभारही त्यांनी मानले आहेत. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

नीना गुप्ता यांनी पोस्ट केलेला हा फोटो पाहून कमेंट बॉक्समध्ये ताहिरा कश्यप, गुल पनाक, सोनी राजदान आणि अशा बऱ्याच प्रसिद्ध चेहऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर या एव्हरग्रीन अभिनेत्रीचा लूक स्टाईल स्टेटमेंडही देतोय असं म्हणायला हरकत नाही. 

 

Read More