Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हे' अनोखं 'शिवराज्याभिषेक गीत' पाहाच

या शिवराज्याभिषेक गीतात लोककला सादर करण्यात आल्या आहेत.

'हे' अनोखं 'शिवराज्याभिषेक गीत' पाहाच

मुंबई : 'शिवराज्याभिषेक' सोहळा हा सर्वांसाठीच एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे. आगामी 'हिरकणी' चित्रपटातील 'शिवराज्याभिषेक गीत' प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात नऊ कलाकार आणि सहा लोककला सादर करण्यात आल्याने हे 'शिवराज्याभिषेक गीत' विशेष ठरत आहे. 

'हिरकणी' चित्रपटातील हे 'शिवराज्याभिषेक गीत' प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, सिध्दार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, सुहास जोशी आणि संगीतकार राहुल रानडे यांनी सादर केलं आहे.

संदीप खरे यांनी या गाणं शब्दबद्ध केलं आहे. तर अमितराज यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. जिया सुरेश वाडकर, अमितराज, दिपाली देसाई, नीलांबरी किरकिरे, संतोष बोटे, विवेक नाईक, गौरव चाटी यांनी 'शिवराज्याभिषेक गीत' स्वरबद्ध केलं आहे.

'हिरकणी' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे. इरादा एंटरटेनमेन्टच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी 'हिरकणी' संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  

Read More