Marathi News> मनोरंजन
Advertisement

बेडरुममध्ये संशयास्पद अवस्थेत सर्वात मादक अभिनेत्रीचा मृतदेह, पाहणाऱ्यांना हादरा

 खासगी आयुष्यात मात्र तिच्या वाट्याला कायमच निराशा आली.   

बेडरुममध्ये संशयास्पद अवस्थेत सर्वात मादक अभिनेत्रीचा मृतदेह, पाहणाऱ्यांना हादरा

मुंबई : काही अभिनेत्रींच्या असण्यानंच प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतो. चित्रपटाला लोकप्रियता मिळो किंवा न मिळो, या अभिनेत्री मादकतेच्याच बळावर कमाल लोकप्रिय होतात. अशाच एका अभिनेत्रीनं तिची कारकिर्द गाजवली ती म्हणजे तिच्या बोल्ड लूकच्या बळावर. 

पैसा, प्रसिद्धी आणि प्रेमही या अभिनेत्रीला मिळालं. पण, खासगी आयुष्यात मात्र तिच्या वाट्याला कायमच निराशा आली. 

जगातील सर्वात मादक अभिनेत्री अशी तिची ओळख होती. पण, ज्यावेळी या अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला तेव्हा मात्र तिच्याकडे पाहणाऱ्यांना हादराच बसला. 

ही अभिनेत्री म्हणजे, मर्लिन मन्रो. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी मर्लिननं जगाचा निरोप घेतला. 5 ऑगस्ट 1962 ला तिचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं. मर्लिनचा मानसोपचारतज्ज्ञ तिच्या बेडरुमची खिडकी तोडून आत गेला आणि पाहतो तर काय, ती बेडवर मृतावस्थेत पडली होती. (marilyn monroe)

तिच्या मृतदेहाशेजारीच झोपेच्या गोळ्यांची एक रिकामी बाटली होती. सूत्रांच्या माहितीनुसार मर्लिनच्या घरी काम करणाऱ्या मदतनीसानं पाहिल्यानुसार मध्यरात्री तिच्या खोलीतील दिवे सुरुच होते, पण दार आतून बंद होतं. 

fallbacks

झोप येत नसल्याची तक्रार मर्लिननं तिच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे केली होती. आपण राईडसाठी बाहेर जात असल्याचंही ती म्हणाली होती. पण, ज्यावेळी मोलकरणीनं ती दार उघडत नसल्याची माहिती डॉक्टरांना दिली तेव्हा मात्र शंका बळावली. ती आसपासच असावी किंवा समुद्रकिनारी गेली असावी असा अंदाजही त्यांनी लावला. 

मृत्यूपश्चात समोर आलेल्या शवविच्छेदन अहवालातून ड्रग्जच्या अतिसेवनामुळं मृत्यू झाल्याची माहिती नमूद करण्यात आली होती. मर्लिनच्या घरातून कोणतंही पत्र किंवा तत्सम ऐवजही मिळाला नव्हता. त्यामुळं आजही तिच्या मृत्यूचं गुढ कायम आहे. 

Read More