Marathi News> मनोरंजन
Advertisement

विवस्त्र होऊन झोपायची अभिनेत्री, चारचौघात जे म्हणाली ते हैराण करणारं...

सर्वात आवडणारी आणि तितकीच रुपवान अभिनेत्री कोणती, असा प्रश्न केल्यास कोणाचं नाव घ्याल ?

विवस्त्र होऊन झोपायची अभिनेत्री, चारचौघात जे म्हणाली ते हैराण करणारं...

मुंबई : काही अभिनेत्रींचं सौंदर्य इतकं घायाळ करणारं असतं की त्याबद्दल नेमकं काय आणि किती कौतुक करावं हाच प्रश्न पडतो. तुम्हाला सर्वात आवडणारी आणि तितकीच रुपवान अभिनेत्री कोणती, असा प्रश्न केल्यास कोणाचं नाव घ्याल ? ऐश्वर्या, दीपिका, सुष्मिता... आहेत. या अभिनेत्री कमाल सुंदर आहेत.

मुद्दा असा की, त्यांच्या सौंदर्याची संपूर्ण जगाला ओळख होण्यापूर्वीच एक चेहरा असा होता ज्यानं सर्वांच्या काळजाचा ठाव घेतला होता.

भारतापासून ती अभिनेत्री कैक मैल दूर होती. पण, तिच्या एका नजरेवर संपूर्ण जग घायाळ झालं होतं. ही अभिनेत्री होती मर्लिन मन्रो.

ज्याप्रमाणे हिंदी कलाजगतामध्ये अभिनेत्री मीना कुमारी यांचा उल्लेख ट्रॅजेडी क्वीन म्हणून होत होता, त्याचप्रमाणे हॉलिवूडमध्ये अभिनेत्री मर्लिन मन्रो हिची चर्चा होती.

रुप, पैसा आणि प्रसिद्धी हे सारंकाही असताना मर्लिन मात्र कायम एकटी एकटीच राहत होती.

मर्लिन आणि तिच्या जगण्यामध्ये अनेक अशा गोष्टी होत्या, ज्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायम कुतूहलाचे प्रश्न होते. आपल्या रहस्यमयी जगण्यातील अशाच एका गोष्टीचा खुलासा मर्लिननं एका मुलाखतीत केला होता.

रात्रीच्या वेळी तुला काय घालून झोपायला आवडतं असं विचारलं असता मी फक्त एक परफ्यूम लावून झोपते.... असं ती म्हणाली.

सैलसर कपडे, पायजमे माझी झोप मोडतात असं कारण पुढे करत तिनं आपली ही सवय जगासमोर आणली.

फक्त परफ्यूम लावून झोपलं असता रात्रीच्या वेळी विवस्त्र असल्यामुळं शरीर पुर्णपणे तणावविरहीत शांततेचा अनुभव घेतं आणि झोप चांगली लागते, असं स्पष्टीकरण तिनं दिलं होतं.

हल्लीच्या दिवसांमध्ये जिथं कलाकार मंडळी त्यांच्या जगण्यातलं सत्य चाहत्यांसमोर आणताना दिसतात तेच मर्लिननं कैक दशकांपूर्वी केलं होतं. म्हणूनच की काय ती आणि तिचं हे निर्भीड व्यक्तीमत्त्वं आजही आपलं मन जिंकतं.

Read More