Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाच्या बाराव्या दिवशीच अभिनेत्रीचा घटस्फोट

अजब लग्नाची गजब गोष्ट.....   

लग्नाच्या बाराव्या दिवशीच अभिनेत्रीचा घटस्फोट

मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधून आलेल्या असतात, यावर अनेकांची सहमती असली तरीही त्याला रकाही अपवाद आहेत. कलाविश्वात तर, नात्यांमध्ये असणारी गुंतागुंत पाहता याचा वारंवार प्रत्यय येत राहतो. सध्याही अशाच  एका अभिनेत्रीच्या नात्याची सर्वदूर चर्चा सुरु आहे. याला निमित्त ठरत आहे ते म्हणजे तिच्या वैवाहिक नात्यात आलेल्या दुरावा. 

'बेवॉच' फेम कॅनेडियन अभिनेत्री पामेला एँडरसन हिने काही दिवसांपूर्वीच पाचव्यांदा लग्नगाठ बांधली होती. हॉलिवूडमधील ७४ वर्षीय चित्रपट निर्माता जॉन पीटर्स यांच्याशी तिने हे नवं नातं सुरु केलं होतं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर ते या निर्णयावर पोहोचले होते. पण, आता मात्र त्यांच्या नात्याविषयी काही वेगळीच माहिती समोर येत आहे. 

अवघ्या १२ दिवसांमध्येच पामेला आणि जॉन या दोघांनीही त्यांचं नातं संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार २० जानेवारीला विवाह झाल्यानंतर या जोडीने अद्याप लग्नाच्या प्रमाणपत्रासाठीची कोणतीही कागदोपत्री प्रक्रिया केलेली नाही.  त्यामुळे हे दोघंही घटस्फोटाच्या वळणावर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. 

माध्यमांच्या एका प्रतिनिधीशी संवाद साधताना पामेलाने काही गोष्टी स्पष्टही केल्याचं म्हटलं जात आहे. 'आपल्या जीवनाकडून आणि एकमेकांकडून आम्हाला नेमकं काय हवं आहे, याचा विचार करण्यासाठी आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ इच्छितो. यादरम्यान तुम्हा साऱ्यांच्या सहकार्यासाठी आम्ही आभारी असू', असं ती म्हणाली. 

fallbacks

आयुष्य हे एक प्रवासाप्रमाणे असून प्रेम ही एक प्रक्रिया आहे. त्यमुळे या वास्तवाचा विचार करतच आम्ही विवाह प्रमाणपत्राला अधिकृत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आमच्या खासगी गोष्टींविषयी गोपनीयता पाळत याचा आदर केला जावा अशी आमची अपेक्षा असल्याचंही तिने स्पष्ट केलं. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

 

पामेला आणि जॉन यांच्या नात्यात आलेला हा दुरावा सर्वांनाच धक्का देणारा ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच पामेलाने तिच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हा या दोघांच्याही नात्यात असं वादळ येण्याची कोणालाही कल्पना नव्हती. शनिवारी सकाळच्या सुमारास पामेला कॅनडाला रवाना झाली. 

Read More