Sydney Sweeney Real Bathwater Soap : हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वीनी (Sydney Sweeney) ही तिच्या सुंदरतेसाठी नेहमीच चर्चेत असते. तिच्या सुंदरतेमुळे नेहमीच ते प्रेक्षकांची मने जिंकताना दिसते. सिडनी स्वीनी ही चित्रपटांपासून अनेक ब्रॅंड्सची ब्रॅंड अम्बॅसिडर म्हणून दिसते. या दरम्यान, त्यांनी लोकप्रियता मिळवली. आता सिडनी स्वीनीनं चाहत्यांमध्ये असलेली तिची लोकप्रियता पाहता. एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला आहे. खरंतर, सिडनी स्वीनीनं एक वेगळाच साबन तयार केला आहे. जे एका लिमिटेड एडिशन प्रमाणे आहेत. जाणून घेऊया नेमकं काय आहे.
सिडनी स्वीनी ही 27 वर्षांची असून तिनं नॅच्युरल साबून लॉन्च केला आहे. हा साबन तिनं त्या पाण्यातून बनवला आहे जे पाणी ती अंघोळीला वापरते. सिडनी स्वीनीनं या प्रोडक्टसाठी Dr. Squatch नावाच्या एका कंपनीसोबत कोलॅबरेट केलं आहे. ती कंपनी फक्त साबन बनवते. सिडनी स्वीनीनं तिच्या या साबनाला 'सिडनीज बाथवॉटर ब्लिस' असं नाव दिलं आहे. असं म्हटलं जातं की सिडनी स्वीनीनं हा साबन बनवण्याचा निर्णय हा चाहत्यांकडून येणाऱ्या मागणीनंतर केला आहे. तिच्या या हटके प्रोडक्टला लॉन्च करण्यासाठी तिनं इन्स्टाग्रामचा वापर केला आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती फोटो शेअर करताना दिसते. तिनं शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ती बाथटबमध्ये बसली आहे आणि तिच्या हातात साबन आहे. बॅकग्राऊंडमध्ये स्वच्छ असं आकाश दिसतंय. हा फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की 'आम्ही सिडनी स्वीनीच्या खऱ्या बाथवॉटरपासून बनवलेला साबन तयार आहे.'
हेही वाचा : अधूरं प्रेम... सुपरस्टार अभिनेत्यासोबत ब्रेकअप अन् 'या' अभिनेत्रीनं स्वत: च्याच भावोजींशी केलं लग्न
पुढे कॅप्शनमध्ये चाहत्यांच्या मागणीविषयी बोलताना लिहिलं की 'का? कारण तुम्ही याची सतत मागणी करत होतात. तर सिडनीनं म्हटलं की चला मग आता हेच करुया.' या साबन खरेदी करण्यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं की जर कोणाला तो खरेदी करायचा असेल तर त्याला हा साबन खरेदी करण्याची गरज नाही. त्याचे अनेक लिमिटेड एडिशन बनवण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी गिव्हअवेचा भाग व्हावं लागेल आणि 18+ होणं गरजेचं असेल. कॉन्टेस्टच्या विनर्सची घोषणा ही 6 जून रोजीला करण्यात येणार आहे.
सिडनी स्वीनीचं हे प्रोडक्ट आता सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधते आहे. इथे तिचे चाहते या नव्या प्रोडक्टला घेऊन खूप उत्साही आहेत. तर इतर लोकांना आश्चर्य झालं आहे. अनेक कलाकार तर ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे म्हणताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आम्हाला स्वत: ला आरशात पाहण्याची खूप गरज आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मी या लिमिटेड एडिशनची प्रतीक्षा करत आहे. ज्यात तू कधी लघवी केली आहे.'