Marathi News> मनोरंजन
Advertisement

उमा थरमनचा खुलासा, निर्मात्याने केले लैगिंक शोषण

 वेस्टीन प्रकरण आणि हॉलीवूडमधील यौन शोषण यासंदर्भात बोलण्याआधी तिने स्वत: च्या रागावर नियंत्रण आणले. 

 उमा थरमनचा खुलासा, निर्मात्याने केले लैगिंक शोषण

लंडन : अभिनेत्री उमा थरमनने सर्वात मोठा खुलासा केला आहे. हॉलीवूड सिने निर्माता हार्वे वेस्टीनने १९९० मध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ल़ंडनच्या सूइट हॉटेलमध्ये हा प्रसंग तिच्यावर ओढवला.

लैंगिक शोषणावर भाष्य  

 वेस्टीन प्रकरण आणि हॉलीवूडमधील यौन शोषण यासंदर्भात बोलण्याआधी तिने स्वत: च्या रागावर नियंत्रण आणले. 
  
 वेस्टीनच्या कथित हल्ल्याचा तिने न्यूयॉर्क टाईममध्ये खुलासा केला. तसेच क्वेंटिन तारांतिनोसोबतच्या प्रकरणावरही चर्चा केली. 

डोक्यावर आघात 

हॉटेलमध्ये झालेल्या घटनेबद्दल थरमनने सांगितले. यामूळे डोक्यावर आघात झाला. त्याने मला धक्का देऊन खाली पाडले.

माझ्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. त्याने खूप नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण तो असे करु शकला नाहीय मला विवश करु शकला नसल्याचेही तिने सांगितले.

Read More