Marathi News> मनोरंजन
Advertisement

Transparent Dress मध्ये रेड कार्पेटवर आली सुपरस्टार, पाहून भल्याभल्यांना फुटला घाम

एका सेलिब्रिटीच्या लक्षवेधी लूकनं सर्वांच्याच नजरा वळवल्या.   

Transparent Dress मध्ये रेड कार्पेटवर आली सुपरस्टार, पाहून भल्याभल्यांना फुटला घाम

मुंबई : ग्लॅमरच्या दुनियेत दर दिवशी फॅशनचे नवे ट्रेंड पाहायला मिळतात. त्यातच एखादा कार्यक्रम म्हणजे फॅशन फॉलो करणाऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरतो. विविध सेलिब्रिटींचे तितकेच बहुविध लूक या ट्रेंडच्या निमित्तानं पाहायला मिळतात. सध्या अशाच एका सेलिब्रिटीच्या लक्षवेधी लूकनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. 

ट्रान्सपरंट अर्थात संपूर्ण पारदर्शी गाऊनमध्ये रेडकार्पेटवर आलेली ही अभिनेत्री आहे, मेगन फॉक्स. (Megan Fox) मेगन MTV VMAs 2021 या कार्यक्रमासाठी पूर्ण पारदर्शी असा पीच रंगाचा चमचमणारा एक स्किन फिट गाऊन घालून पोहोचली. रेड कार्पेटवर तिनं कॅट वॉकही केला, त्यावेळी सर्वांच्याच काळजाचा ठोका मेगननं चुकवला. मेगनच्या या ट्रान्सपरंट ड्रेसमधून तिचे अंडरगार्मेंट्सही स्पष्ट दिसत होते. हा लूक कॅरी करण्याचा तिचा अंदाज अनेक फॅशन प्रेमींची मनं जिंकून गेला. 

प्रियकरासोबत आली मेगन 
मेगन (Megan Fox) या कार्यक्रमासाठी प्रियकरासोबत पोहोचली होती. मेगनचा प्रियकरही तिच्याप्रमाणंच अगदी हटके लूकमध्ये दिसला होता. लाल रंगाचा ग्लिटरी सूट घालत त्यानं आपला लूक परिपूर्ण केला होता. पण, मेगनच्याच लूकनं इथं भल्याभल्यांना घाम फोडला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Out Magazine (@outmagazine)

मेगन आणि तिच्या प्रियकराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहींनी तिच्या लूकची प्रशंसा केली, तर काहींनी मात्र तिची खिल्ली उडवली. मेगनच्या लूकला पसंती देणाऱ्यांनी तिच्या प्रियकराच्या स्टाईल स्टेटमेंटलाही दाद दिली. तिनं आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. येत्या काळात मेगन 'बिग गोल्ड ब्रिक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More