Marathi News> मनोरंजन
Advertisement

Honey Singh सोबत क्लबमध्ये असं काय घडलं? ज्यामुळे त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं

हनी सिंगसोबत धक्कादायक घटना....  पुन्हा एकदा हनी सर्वत्र चर्चेत...  

Honey Singh सोबत क्लबमध्ये असं काय घडलं? ज्यामुळे त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं

मुंबई : प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग कायम त्याच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा हनी एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीत एका क्लबमध्ये हनीसोबत काही अज्ञात व्यक्तींनी गैरवर्तन केलं. त्यानंतर हनीने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.  ही घटना 26 मार्च रोजी घडली आहे. 

त्यावेळी नक्की काय झालं? 
क्लबमध्ये हनीचा शो सुरू होता. तेव्हा अचानक 5 ते 6 लोक त्याठिकाणी आले. त्यानंतर ते हनी सिंग आणि अन्य कलाकारांना  धमकावू लागले. एवढंच नाही तर, शोमध्ये त्या अज्ञात लोकांनी दारूच्या बाटल्या देखील फोडल्या शिवाय कलाकारांना धक्काबुक्की देखील केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रकरण तापल्यानंतर हनीने शो बंद केला. पण अद्याप या प्रकरणावर हनी सिंगने अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार... हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हनीने दाखल केली FIR
रिपोर्टनुसार हनीने  FIRमध्ये  लिहिले आहे की, 'एका व्यक्तीने माझा हात पकडला आणि मला स्टेजवरून खाली घेचत होता... मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला... त्याच्याकडे हत्यार असल्याचं देखील मी पाहिलं... '

दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक चौकशी करत असल्याचं समोर आलं  आहे. 

Read More