Marathi News> मनोरंजन
Advertisement

Honey Singh च्या हनीमूनची रात्र, 10 वर्षांनंतर पत्नीकडून बेडरूममधील सत्य समोर

'फक्त वचन दिल होतं म्हणून लग्न केलं, हनी सिंगचं कधी माझ्यावर प्रेम नव्हतं.... '

Honey Singh च्या हनीमूनची रात्र, 10 वर्षांनंतर पत्नीकडून बेडरूममधील सत्य समोर

मुंबई :  सर्वांचा आवडता रॅपर 'यो यो हनी सिंह' (Yo Yo Honey Singh) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने 'द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट' अंतर्गत एक याचिका न्यायालयात दाखल केली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तिनं न्याय मागितला आहे. लग्न झाल्यानंतर हनी त्याच्या पत्नीला सतत त्रास द्यायचा असं सांगण्यात येत आहे. आता शालिनी हनीमूनच्या रात्री घडलेल्या धक्कादायक घटनांचा खुलासा केला आहे. 

शालिनी आणि हनीचं लग्न 2011 साली झालं होतं. हिरदेश सिंह उर्फ हनी सिंगचं पहिलं प्रेम म्यूझिक होतं आणि यामध्ये शालिनीने कायम त्याची साथ दिली. पण हनिमूनच्या रात्री हनीचं सर्व सत्य शालिनीच्या समोर आलं. जीत कलसी नावाच्या एक व्यक्तीने आम्हाला मॉरिशसचं पॅकेज गिफ्ट केलं. जेव्हा शालिनी आणि हनी मॉरिशसला पोहोचले तेव्हा त्याची वागणूक पूर्णपणे बदलली.

'तू असा गप्प का आहेस?' असा प्रश्न जेव्हा शालिनीने हनीला विचारला तेव्हा हनी तिच्यावर जोरात ओरडला. मी हनी सिंग आहे कोणाची हिंमत नाही मला प्रश्न विचारण्याची, तू मला कोणतेही प्रश्न विचारू नको. सध्या शालिनी आणि हनीचं नातं संपण्याच्या मार्गावर आहे. 

पुढे हनी म्हणाला, 'मी लग्न करून अडचणीत अडकलो आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचं नव्हातं. पण तुला वचन दिलं होतं म्हणून मी लग्न केलं.' दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हनीकडून असे शब्द ऐकल्यानंतर शालिनीला मोठा धक्का बसला. 

 

Read More