Entertainment Horror Movie : काळानुरूप चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचा प्राधान्यक्रमही बदलत गेल्याचं पाहायला मिळालं. एक काळ असा होता जेव्हा थरारपटांना प्राधान्य मिळालं, काही दिवसांना प्रेक्षकांनी विनोदी कथानकाच्या चित्रपटांना पसंती दिली, तर रहस्यपटही यामध्ये मागे राहिले नाहीत. या साऱ्यामध्ये भयपटांनी मात्र त्यांचं स्थान तितक्याच भक्कमपणे टिकवून ठेवलं. याच भयपटांमध्ये एक असा चित्रपट साधारण 15 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याचे अनेक फोटोसुद्धा गुगलवर पाहता येत नाहीत.
हा चित्रपट इतका भयावह आणि मन विचलित करणारा होता की काही देशांनी त्याच्या प्रदर्शनावरही निर्बंध आणले, जे आजही कायम आहेत. फक्त घाबरवणारी दृश्यच नव्हे, तर या चित्रपटामध्ये अनेक इंटिमेट सीन आणि काही अतिशय हिंसक दृश्यांचाही भरणा होता, ज्यामुळं सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटावर शेरा मारला होता.
आक्षेपार्ह दृश्य आणि धडकी भरवणाऱ्या कथानकासह 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव होतं 'आय स्पिट ऑन युवर ग्रेव (I Spit on Your Grave)'. चित्रपटाचं कथानक एका अशा मुलीवर आधारलेलं आहे जिच्यावर प्रचंड अन्याय होतो. जंगलात वाट हरवलेल्या या मुलीवर असे काही प्रसंग ओढावतात जिथं तिच्यावर कैक संकटं ओढावतात. त्यातून कसाबसा जीव वाचवत ही महिला/ मुलगी सूडाच्या भावनेनं आपल्याला त्रास देणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उध्वस्त करण्याचा विडा उचलते.
या चित्रपटामध्ये काही अशी दृश्य दाखवण्यात आली आहेत ज्यामध्ये दाखवण्यात आलेल्या हिंसेचा इतरांवर वाईट परिणाम होऊ शकतो असंही काही समीक्षकांचं मत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील काही दृश्य पाहून प्रेक्षकांची विचारशक्ती तिथंच थांबली, हातपाय थंड पडले होते.
आयर्लंड, कॅनडा, वेस्ट जर्मनी, आईसलँड, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया इथं या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. 2010 मधील हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डे ऑफ द वुमन'चा रिमेक आहे. मेइर जार्चीनं चित्रपटाचं कथानक असून, त्यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आयएमडीबीनं या चित्रपटाला 10 पैकी 6.2 रेटिंग दिलं आहे.