Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्याचा मोठा खुलासा, प्रेग्नेंसीमध्येही पत्नीची डिमांड अशी करायचा पूर्ण

वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

 अभिनेत्याचा मोठा खुलासा, प्रेग्नेंसीमध्येही पत्नीची डिमांड अशी करायचा पूर्ण

मुंबई : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँ तिच्या लव्ह लाईफ आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुसरतने आधी बिझनेसमन निखिल जैनशी लग्न केले आणि नंतर त्याला अवैध ठरवून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अभिनेता यश दासगुप्ताच्या मुलाची आई झाली. 

मात्र, आता नुसरत आणि यश दासगुप्ता यांनी एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. आता यश दासगुप्ताने नुसरत जहाँच्या प्रेग्नेंसीमधील एका गोष्टींचा खुलासा केला आहे. यश दासगुप्ताने प्रेग्नेंसीमध्ये नुसरत जहाँची मागणी कशी पूर्ण करायची हे सांगितले आहे. यश दासगुप्ता म्हणाला की, गरोदरपणात मीडियापासून लपून राहणे अधिक कठीण होते.

fallbacks

यशने सांगितले की, प्रेग्नेंट नुसरतला मीडियापासून वाचवणे किती कठीण होते.अभिनेता आणि राजकारणी यश दासगुप्ता आणि नुसरत जहाँ नुकतेच 'इश्क विथ नुसरत' या रेडिओ शोमध्ये दिसले. यशने या शोमध्ये सांगितले की, "जेव्हा नुसरत तीन महिन्यांची गरोदर होती, तेव्हा अचानक तिने मला रोमँटिक ड्राईव्हवर नेण्याचे सांगितले.

पण नुसरत म्हणाली की,  तिला मीडियासमोर यायचे नाही कारण तिला कोणत्याही मेकअपशिवाय सामान्य महिलेप्रमाणे बाहेर जायचे आहे, मीडियावाल्यांनी तिचा फोटो क्लिक करावा असे तिला वाटत नव्हते. आम्ही ड्राईव्हसाठी बाहेर पडलो, तेव्हा काही मीडियावाले आमच्या मागे लागले होते. मी कसा तरी त्यांना चकमा देऊन बाहेर पडण्यात यशस्वी झालो.

fallbacks

'आपण 24×7 चांगले दिसणे आवश्यक नाही...'

यश दासगुप्ता म्हणाला, "अभिनेते आणि अभिनेत्रींची सर्वात मोठी समस्या ही असते की त्यांना नेहमी चांगले दिसावे लागते, पण ते 24×7 शक्य नसते. आपण आता हे छान कपडे घालून इथे बसलो आहोत पण आपण असेच जगतो असे नाही. अभिनेत्री घरात तशा नसतात

लाँग ड्राईव्हमध्ये आम्ही मेकअपशिवाय साधे कपडे घालून घरी गेलो. आम्ही गाडीत बसणार असताना अचानक मीडियावाल्यांनी आम्हाला पाहिले. त्यानंतर कारच्या पाठलागात जे घडले तो लपाछपीचा खेळ होता.

Read More