Sitaare Zameen Par Box Office Collection Day 2: दरवेळी प्रमाणे बॉलिवूड अभिनेता आमिर खानने 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून एक नवीन संकल्पना प्रेक्षकांसमो सादर केली आहे. या चित्रपटात आमिर खान दिव्यांग मुलांना बास्केटबॉलचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. अशातच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात सविस्तर
20 जून रोजी आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. आमिर खानच्या या चित्रपटात अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने देखील मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट आधीपासून चर्चेत होता. दरम्यान, या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे.
'सितारे जमीन पर'चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 'केसरी 2' ला टाकले मागे
रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. सुरुवातीच्या आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी 21.50 कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. अशातच या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये 32.20 कोटींची कमाई केली आहे. परंतु, दुसऱ्या दिवसाचे अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. परंतु, या चित्रपटाच्या कमाईत रविवारी मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असा अंदाज लावला जात आहे. जर चित्रपटाने शनिवारी इतकेच कलेक्शन केले तर आमिर खानचा हा चित्रपट 50 कोटी रुपयांचे कलेक्शन करून 2025 मधील अनेक चित्रपटांचा विक्रम मोडू शकतो.
आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी 'लाल सिंग चड्डा' या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. तर नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा 'केसरी 2' या चित्रपटाला देखील आमिर खानच्या चित्रपटाने मागे टाकले आहे. अक्षय कुमारच्या 'केसरी 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.75 कोटी रुपयांची कमाई केली होती.