Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पा शेट्टीनं केली महागडी सर्जरी, त्यापुर्वी 'अशी' दिसायची अभिनेत्री; पाहून बसेल धक्का

Shilpa Shetty Birthday: काल शिल्पा शेट्टीचा 48 वा वाढदिवस होता. आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं चाहत्यांना वेड लावणारी शिल्पा ही आधी फार वेगळी दिसायची. तिच्या लहानपणीचे आणि तरूणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगली आहे. तुम्ही तिला ती सर्जरीपुर्वी कशी दिसायची हे पाहिलं आहे? 

शिल्पा शेट्टीनं केली महागडी सर्जरी, त्यापुर्वी 'अशी' दिसायची अभिनेत्री; पाहून बसेल धक्का

Shilpa Shetty Birthday: सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कायमच ओळखल्या जातात. त्यातून महागड्या सर्जरी केल्यानंतर सुंदर दिसण्यासाठीही या अभिनेत्री धडपड घेताना दिसतात. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही महागड्या सर्जरी केल्या आहेत आणि त्यांचे रूपचं पुर्णत: बदलून गेलेले आहे. आता त्यांचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना त्या ओळखूही येत नाहीत. जान्हवी कपूर, श्रीदेवी, प्रियंका चोप्रा आणि अशा अनेक अभिनेत्रींंनी आपली सर्जरी करून घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या सर्जरी अनेकदा चर्चा रंगली होती. अनेकदा या अभिनेत्रींचे सर्जरी पुर्वीचे आणि सर्जरीनंतरचे फोटोही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यात एका अभिनेत्रीची चांगलीच चर्चा रंगली होती आणि ती म्हणजे शिल्पा शेट्टी. 

शिल्पा शेट्टी ही नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आली. परंतु त्याआधी तिनं अनेक छोट्या मोठ्या जाहिरातींतून काम केली आहे. त्यावेळची शिल्पा आणि आत्ताची शिल्पा यात जमिन आसमानाचा फरक आहे. त्यावेळीची शिल्पा पाहिलीत तर ती एकदम साधी आणि फारशी ग्लॅमरस व स्टायलिशही नव्हती. त्यातून तिचा चेहराही सावळा होता. साधी साडी नेसणारी सोबतच वेणी घालणारी आणि कपाळाला टिकली लावणारी अशी सोज्वळ शिल्पा होती. तिच्या दिसण्यावरून आता ती जशी दिसते त्यावरून चाहत्यांनी पुर्वीची शिल्पा ओळखताच येणार आहे. आज शिल्पा शेट्टीचं नावं घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर येते ती ग्लॅमरस, फीट आणि आकर्षक शिल्पा शेट्टी. आज ती हजारो तरूण मुलांच्या 'दिल की धडकन' बनली आहे. 

हेही वाचा - कार्तिक आर्यनच्या नाकाची सर्जरी? मैत्रिणीच्या लग्नात मोठ्या रूबाबात आलेला अभिनेता वाईटरीत्या ट्रोल

आधी 

fallbacks

1993 साली आलेल्या शाहरूख खानच्या 'बाजीगर' चित्रपटात तिनं काम केलं होतं. या चित्रपटात तिचा फार छोटासा रोल होता. परंतु तेव्हा तिचा अभिनय फारच गाजला आणि तिची प्रसंशाही झाली. त्याकाळी माधुरी दीक्षित, जूही चावला, श्रीदेवी यांसारख्या अभिनेत्री असतानाही तिनं आपली स्वत:शी अशी एक ओळख बनवली. सध्या ती फारशी कुठल्याच चित्रपटांमध्ये दिसत नसून तिनं ओटीटी आणि रिएलिटी शोमधून आपलं नशीब आजमावते आहे. दोन वर्षांपुर्वी तिचा पती राज कुंद्राच्या प्रकरणामुळे शिल्पा ही सार्वजनिक जीवनापासून दूर होती. परंतु आता ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. 

आता 

fallbacks

इन्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. ती आपले योगाचे व्हिडीओ, रील्स चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. अनेकदा राज कुंद्रा आणि मुलांसोबत ती स्पॉटही होती. तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सचीही मलायका इतकीच चर्चा होते. 

Read More