Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan च्या सुटकेसाठी Hrithik Roshan च्या कुटुंबाकडून सतत प्रयत्न सुरु

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. 

Aryan Khan च्या सुटकेसाठी Hrithik Roshan च्या कुटुंबाकडून सतत प्रयत्न सुरु

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आर्यनच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. अभिनेता हृतिक रोशनने 7 ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या समर्थनार्थ एक दीर्घ पोस्ट लिहिली. आता पुन्हा एकदा हृतिक रोशनने आर्यन खान प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्यन खानची सुटका व्हावी अशी हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझेन यांची इच्छा आहे. त्यासाठी दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्यनची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनी पोस्ट शेअर करत आर्यन साठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आर्यन खानकडून कोणतीही जप्ती करण्यात आलेली नाही. असे असतानाही आर्यन खानचा जामीन फेटाळण्यात आला आहे. आर्यन खानला जामीन द्यायला हवा होता. पण मला कळत नाही की, नितीम सांबरे स्वतःच्याच निर्णयाचा विरोध का करत आहेत. दुष्यंत दवे यांनी नितीम सांबरे यांचा निकाल पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

Read More