Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hrithik Roshan कठीण काळात असं वाढवतो मुलांचं मनोधैर्य, म्हणून तोच 'बेस्ट फादर'

'बेस्ट फादर'चं उत्तम उदाहरण म्हणजे Hrithik Roshan, घटस्फोटानंतरही पावलो-पवली अशी देतो मुलांची साथ  

Hrithik Roshan कठीण काळात असं वाढवतो मुलांचं मनोधैर्य, म्हणून तोच 'बेस्ट फादर'

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि पहिली पत्नी सुझान खान काही वर्षांपूर्वी विभक्त झाले. पण दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम आहे. घटस्फोट झाल्यानंतर देखील दोघे मुलांची योग्य काळजी घेताना दिसतात. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले असले तरी मुलांसाठी मात्र दोघ एकत्र येतात. आता देखील हृतिकचा मुलांसोबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हृतिक मुलाचं मनोधैर्य वाढवताना दिसत आहे. हृतिकचा हा व्हिडीओ पाहाता अभिनेता 'बेस्ट फादर'चं उत्तम उदाहरण आहे.. असं म्हणायला हरकत नाही. 

हृतिक रोशनने त्याच्या फेसबुक पेजवर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची दोन मुलं  ‘ऋधान’ आणि‘ऋहान’सोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये ऋधान बंजी जंपिंग  करताना घबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. 

मुलाला बंजी जंपिंगला घाबरताना पाहून तो मुलाचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मुलाचं मनोधैर्य वाढवताना हृतिक म्हणतो, 'तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीच्या तुम्ही शेवटी प्रेमात पडता.' असं हृतिक मुलाला सांगताना दिसत आहे. 

अभिनेता पुढे म्हणतो, 'मोकळा श्वास घे आणि घाबरू नको कारण तुला फक्त काही क्षण पडल्यासारखे वाटेल. पण आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात असत. म्हणून अशा गोष्टी करायला हव्या, ज्यामधून तुम्हाला नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत.'

अखेर वडिलांचं ऐकून ऋधान उडी मरतो. सध्या हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

Read More