Marathi News> मनोरंजन
Advertisement

गर्लफ्रेंडच्या प्रत्येक पोस्टला अशी दाद देतो हृतिक रोशन, लग्नाचे संकेत...

अशी आहे हृतिक आणि त्याच्या गर्लफ्रेंडची लव्हस्टोरी 

गर्लफ्रेंडच्या प्रत्येक पोस्टला अशी दाद देतो हृतिक रोशन, लग्नाचे संकेत...

मुंबई : हृतिक रोशन (Hrithik Roshan) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. चाहत्यांना गेल्याकाही दिवसांपासून हृतिकच्या लग्नाची उत्सुकता आहे. कारण ऋतिहृतिकच्या आयुष्यात एका सुंदर मुलीची एन्ट्री झाली आहे. कधी हृतिक तिच्यासोबत डिनर डेटला जाताना दिसतो. तर कधी हृतिकच्या घरी ती स्वतः दिसते. आता तर हृतिक तिची प्रत्येक इंस्टाग्राम पोस्ट पाहतो. त्यावर मनातील भावना व्यक्त करणारी कमेंट करतो. 

हृतिक आणि सबाची गोष्ट

हृतिक रोशन आणि सबा आझाद फेब्रुवारीमध्ये डिनक डेटनंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले तेव्हापासून  चर्चेत आहेत. आता दोघांनीही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर हृतिक आणि सबा यांच्यात नक्कीच काहीतरी सुरू झाल्याचं जाणवतं.

हृतिक प्रत्येक फोटोला करतात कमेंट 

सबा आझाद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सबाने सोमवार, 7 मार्च रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले.

ज्यामध्ये तिने हॉलिवूडची अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नची वेशभूषा केली आहे. सबाने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुम्ही मला मिस हेपबर्न आझाद म्हणू शकता!! मी एका दिवसासाठी मिस हेपबर्न बनले आहे.'' पोस्टच्या कमेंट विभागात हृतिकने लिहिले- 'टाइमलेस.'

सबाकरता पाठवलं खास जेवण

याआधीही सबा आझादने तिच्या इन्स्टाग्रामवर हे गाणे गायले होते आणि अभिनेत्यानेही या पोस्टवर कमेंट केली होती. तुम्ही एक असामान्य व्यक्ती आहात, असे त्यांनी लिहिले आहे. सबाने हे पोस्ट बंगाली गाणे गायले आहे.

आजकाल अभिनेत्रीची तब्येत बिघडली असून तिच्या रोशन कुटुंबीयांनी जेवणही पाठवले होते. ज्यावरून हे स्पष्ट होते की हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saba Azad (@sabazad)

हृतिक रोशनच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच सैफ अली खानसोबत  ऍक्शन थ्रिलर विक्रम वेधामध्ये दिसणार आहे. त्याच नावाच्या प्रसिद्ध तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

2023 च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणाऱ्या 'फाइटर' चित्रपटात हृतिक पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. दुसरीकडे, सबा आझाद, महान भारतीय शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित 'रॉकेट बॉईज' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. 

जीम सरभ आणि इश्वाक सिंग यांनी भूमिका केली होती. सबाने शोमध्ये होमी जहांगीर भाभा यांची प्रेयसी परवाना इराणीची भूमिका साकारली होती.

Read More