Hrithik Roshan's Sister Sunaina : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशननं दारूचं व्यसन आणि त्यातून बाहेर कशी पडली याविषयी वक्तव्य केलं आहे. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखीत रीहॅबमध्ये तिचे कसे दिवस गेले आणि तिचा अनुभव कसा हता याविषयी सांगितलं आहे. कसा बसा तिनं हा लढा दिला आणि अखेर तिनं तिच्या व्यसनावर नियंत्रण मिळवलं. याशिवाय तिनं कॅन्सर आणि टीबी सारख्या आजारांना तिनं कसा लढा दिला याविषयी सांगितलं. त्यासोबतच हर्पीज जोस्टरचं देखील निदान झाल्याचं तिनं म्हटलं.
सुनैना रोशननं तिला असलेले आजार आणि मद्यपाना पाहता तिच्या कुटुंबाला सांगितलं की तिला परदेशात रीहॅब सेंटरमध्ये पाठवा, कारण ती अजून सहन करू शकत नव्हती. ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दारू प्यायची असं तिनं सांगितलं. हे सगळं ती तेव्हा करत होती जेव्हा तिचं स्वत: वर प्रेम नव्हतं तिला स्वत: ची चिड येऊ लागली होती. रीहॅबच्या काळाविषयी बोलताना सुनैना म्हणाली, 'तिथे 6-7 काउंसिलर मला विचारत रहायचे. तिथे मी 28 दिवस झोपले नव्हते. ते प्रश्न विचारायचे. तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना बाहेर काढायच्या असतात. कोणताही परफ्युम, कॉफी, साखर किंवा चॉकलेट नाही. कोणत्याही नशेचं व्यसन नाही. हे खूप कठीण होतं. मद्यपान करण्याची माझी काही इच्छा नव्हती. मी 6-7 तास सततच्या चौकशीला कंटाळले होते. खूप कठीण काम होतं. पण त्यामुळे मला खूप मदत झाली', सुनैनानं हे पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
हेही वाचा : भारतीय सिनेमाला सगळ्यात आधी 1000 कोटी देणारी अभिनेत्री; अनुष्का - दीपिका नाही तर बॉलिवूडमधील चर्चेतलं नाव
याशिवाय पुढे सुनैनानं तिच्या दारूच्या व्यसनाविषयी सांगितलं. दारू प्यायल्यानंतर तिच्या शरिरावर जखमा दिसण्याविषयी सांगितलं. सुनैना म्हणाली, 'मी बेडवरून आणि खुर्चीवरून खाली पडायचे आणि माझ्या शरीरावर दुखापत झाल्याचे निशाण असायचे. मी या सगळ्यातून गेली आहे. जेव्हा दारूची नशा उतरते, तेव्हा तुम्हाला कसंतरी वाटू लागतं. डिहायड्रेशन आणि भीती वाटू लागते. त्यामुळे त्याला लपवण्यासाठी तुम्ही आणखी मद्यपान करतात. त्या दरम्यान, तुम्हाला चांगलं वाटू लागतं. पण त्यानंतर तुमच्यावर जे परिणाम होतात ते भयानक असतात.'