Marathi News> मनोरंजन
Advertisement

गर्लफ्रेंड सबा आझादसाठी हृतिक रोशनकडून पोस्ट शेअर; चाहत्यांना बसतोय धक्का

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असतो

गर्लफ्रेंड सबा आझादसाठी हृतिक रोशनकडून पोस्ट शेअर; चाहत्यांना बसतोय धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासामुळेही खूप चर्चेत असतो. सध्या हा अभिनेता सिंगर सबा आझादला डेट करत आहे. दोघांनीही चाहत्यांसमोर त्यांचं नात स्वीकारालं नसेलही पण त्यांच्या नात्याची झलक अनेकदा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अलीकडेच, दोघंही सुट्टीसाठी पॅरिसला गेले होते. ज्याचे फोटो  सबाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

दरम्यान, दोघंही पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. यावेळी हृतिकने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेता त्याची गर्लफ्रेंड सबाला चिअर करताना दिसत आहे. अलीकडेच हृतिक त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत त्याच्या संगीत कॉन्सर्टमध्ये पोहोचला होता. कॉन्सर्टच्या आधी, हृतिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं,  'किल इट गाइज! तुम्ही हैद्राबादसाठी तयार आहात का!

अभिनेत्याने अशाप्रकारे सोशल मीडियावर सबाला उघडपणे चिअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने अनेक कॉन्सर्टमध्ये साबा आझादला चीअर केलं आहे. याआधीही प्रसिद्ध सिनेनिर्माता करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाला एकत्र स्पॉट झाल्यामुळे दोघेही चर्चेचा विषय बनले होते. हृतिक आणि सबा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सबा केवळ हृतिकसोबतच नाही तर अभिनेत्याचं कुटुंब आणि त्याची एक्स पत्नीसोबतही स्पॉट झाली आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय जेव्हा सबाने सोशल मीडियावर एक खास लूक शेअर केला तेव्हा हृतिकची आई पिंकी रोशनने सबाचं कौतुक केलं होतं.

fallbacks

अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, हृतिक लवकरच सैफ अली खानसोबत त्याच्या आगामी चित्रपट विक्रम वेधामध्ये दिसणार आहे. पुष्कर-गायत्री दिग्दर्शित हा चित्रपट ३० सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय हृतिक सध्या अमेरिकेत त्याच्या 'फायटर' या एक्शन चित्रपटाचं शूटिंग करत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Read More