Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा... हृतिक रोशनची फिट बॉडी , बोलतोय बॉलीवुड बाइसेप्स की जय

हृतिकने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, त्यामध्ये तो आपली बायसेप्स (Biceps) दाखवताना दिसत आहे. हृतिक रोशनचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा... हृतिक रोशनची फिट बॉडी , बोलतोय बॉलीवुड बाइसेप्स की जय

हृतिक रोशन हा बॉलीवुडमध्ये त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याला त्याच्या बॉडी आणि लूकमुळे बॉलीवुडचा 'ग्रीक गॉड' पण म्हणटलं जातं. हृतिक रोशन सोशल मीडियावर नेहमीचं आपले फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

हृतिकने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, त्यामध्ये तो आपली बायसेप्स (Biceps) दाखवताना दिसत आहे.हृतिक रोशनचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हृतिक रोशन ने आपल्या बाइसेप्सचा फोटो शेअर करत एक मजेदार कॅप्शनपण दिले आहे. त्याने लिहिलं की, 'बोलो बॉलीवुड बाइसेप की जय'. हृतिकने हा फोटो ब्लॅक आणि व्हाईटमध्ये शेअर केला त्यामुळे तो चागंलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

 

 

 

हृतिकचे चाहते त्याच्या या फोटोला मजेदार कमेंटस करताना दिसत आहेत. चाहत्यांसोबतच अनेक स्टार्सही फोटोला पसंती देत आहेत. त्यासोबतचं काही चाहते याफोटोवरून साऊथचा येणारा सुपरहिट सिनेमा 'विक्रम वेधा (Vikram Vedha)' चा हिंदी रीमेक च्या शुटिंगचा असल्याचा बोलत आहेत.

हृतिक रोशनच्या येणाऱ्या सिनेसा बद्दल सागायचं झालं तर तो दीपिका पादुकोणसोबत 'फायटर' या नव्या सिनेमामध्ये दिसणार आहे. 'फायटर' या सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत. हृतिक रोशन 'विक्रम वेधा' च्या हिंदी रीमेकमध्ये लीड रोलला दिसणार आहे. सिनेमामध्ये त्याच्या सोबत सैफ अली खानपण असणार आहे. यासिनेमामुळे हृतिक रोशनच्या चाहत्यांना त्याचा जोरदार अ‍ॅक्शनचा अंदाज बघायला मिळणार आहे.

Read More