Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hritik Roshan - सबाच्या वयातील अंतर धक्का देणारं...

हृतिकनं अगदी बिनधास्तपणे तिचा हात पकडल्याचं दिसून आला.   

Hritik Roshan - सबाच्या वयातील अंतर धक्का देणारं...

मुंबई :  बॉलिवूडमध्ये नव्या सेलिब्रिटी जोड्यांची चर्चा सुरु असतानाच अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत एक ओळखीचा चेहरा दिसला आणि सर्वांना धक्काच बसला. हृतिक कोणा अभिनेत्रीसोबत किंवा कोणा एका सेलिब्रिटीसोबत दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी चर्चा होण्याचं कारण म्हणजे हृतिकनं अगदी बिनधास्तपणे तिचा हात पकडल्याचं दिसून आला. (Hritik Roshan saba azad age)

विकेंडला सर्वजण सुट्टीचा आनंद घेत असताना तिथं बॉलिवूड वर्तुळात मात्र वादळ उठलं ते म्हणजे एका नव्या जोडीचं आणि त्यांच्या नात्याचं. 

सुझॅन खान, हिच्याशी विभक्त झाल्यानंतर अनेकदा हृतिक तिच्यासोबतही दिसला, तर चाहत्यांना वाटलं की हे नातं पुन्हा नव्यानं आकार घेईल. 

पण, तसं झालं नाही. तिथं म्हणे सुझॅननं जीवनाची वेगळी वाट निवडलेली असतानाच, आता हृतिकही याच वेगळ्या वाटेवर गेल्याचं कळत आहे. 

दोन मुलं असणारा हृतिक आता 48 व्या वर्षात 32 वर्षांच्या सबा आझादला डेट करत आहे असं पाहायला मिळतंय . 

16 वर्षांहून लहान मुलीला बी -टाऊनचा हा ग्रीक गॉड डेट करत असल्याच्या चर्चा आता कितपत खऱ्या हे मात्र खुद्द हृतिकच जाणतो. पण, आता चर्चा सुरुच झाल्यात तर त्यांना फाटे तर फुटणारच... 

Read More