Marathi News> मनोरंजन
Advertisement

अचानक हृतिक रोशन झाला गायब, शोध घेण्यासाठी पोहचले पोलीस, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

 हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे.

अचानक हृतिक रोशन झाला गायब, शोध घेण्यासाठी पोहचले पोलीस, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

मुंबई : हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. अभिनयाबरोबरच लोक त्याच्या लूकचं खूप कौतुक करतात. भोळा दिसणारा हृतिक बालपणात खूप खोडकर होता. एकदा तो स्वतःच्या घरात हरवला होता आणि मग पोलिसांनाही यासाठी बोलवावं लागलं होतं.

द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला किस्सा
जेव्हा हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन त्याच्यासोबत एकदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'एकदा तो स्वत:च्याच घरी हरवला होता. शाळेतून घरी आला. पण तो कुठेच सापडत नव्हता. सगळ्या खोल्या शोधूनही तो कुठेच नव्हता! बोडरुम आम्ही लॉक केला होता त्याची चावी आमच्याकडे होती. आत जाण्याचा प्रश्नच नव्हता. २-३ तास ​​झाले पण तो मिळतच नव्हता. त्यानंतर आम्ही पोलिसांना घरी बोलावलं.

हृतिक खिडकीतून खोलीत शिरला
हृतिकने पुढे सांगितलं की, तो त्याच्या आईच्या खोलीत होता. त्या बेडरुमला 'एक छोटीशी खिडकी होती, ती उघडून मी खोलीत गेलो. मला व्हीएचएस प्लेयरवर बॅटमॅन वि सुपरमॅन बघायचा होता. खोली बाहेरुन कुलूपबंद होती, बाहेरचं मला आणि बाहेरून घरच्यांना काहीच कळत नव्हतं. सगळे पोलीस वगैरे बाहेर आले होते. मी आत झोपलो. मग 4 तासांनी मी उठलो आणि माझी नजर खिडकीकडे गेली.

रडून रडून आईची वाईट स्थिती
हृतिक रोशनने सांगितलं, ''मम्मीला मी तिथे पाहिलं आणि मी फक्त मम्मीला पाहत राहिलो कारण ती जोरजोरात रडत होती. खिडकीच्या बाहेर माझी आई इकडून तिकडे रडत चालत होती. येवढ्यात आईचा लक्ष माझ्यावर गेलं. ऐवढ्यात आई जोरजोरात रडू लागली, तिने पप्पांना मोठ्याने हाक मारली आणि म्हणाली - डुग्गू.'

Read More