Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर Hruta Durgule ने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी

मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी हृता दुर्गुळे चाहत्यांना देणार आनंदाची बातमी   

लग्नानंतर Hruta Durgule ने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी

मुंबई : 'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनं प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्न केलं आहे. लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जाणार आहे. लग्नानंतर हृताने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

हृताचा एक वेगळा आणि हटके अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार आहे. हृताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. हृता 'टाईमपास 3' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

सिनेमाचा टीजर शेअर करत हृताने कॅप्शनमध्ये, 'पालवीची स्टाईल जितकी कडक तितकाच 'टाईमपास ३'च्या टीजरचा जलवा पन बेधडक... 1M व्ह्यूज झालेत ना पब्लिक! ते पन फक्त २४ तासात ..येतेय पालवी आणि दगडूची गोष्ट 'टाईमपास ३' २९ जुलै २०२२ पासून सर्व चित्रपटगृहात.' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे हृताचा पती, प्रतीक शाह ? 
हिंदी मालिका विश्वात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री मुक्ता शाह यांचा मुलगा म्हणजे प्रतीक. बऱ्याच हिंदी मालिकांचं दिग्दर्शन तो करतो.  'तेरी मेरी इक जिंदगी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' या मालिकांची नावं त्याच्यासोबत जोडली जातात.

हृता आणि प्रतीची ही जोडी पाहता त्यांच्या प्रेमाच्या मालिकेचीही दणक्यात सुरुवात झाली आहे, ज्याच्या दिग्दर्शनाची धुरा नेमकी कोणाच्या हाती असणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. 

Read More