Marathi News> मनोरंजन
Advertisement

गरोदरपणात पतीने घराबाहेर काढले, 2 घटस्फोट, आता अभिनेत्री दिसतेय इतकी बोल्ड

इतक्या अडचणींवर ही तिने मात करत आज वेगळी ओळख निर्माण केली.

गरोदरपणात पतीने घराबाहेर काढले, 2 घटस्फोट, आता अभिनेत्री दिसतेय इतकी बोल्ड

मुंबई : काही लोकांच्या आयुष्यात अडचणी कमीच होत नाहीत. 2 वेळा घटस्फोटाचं दुःख तिने भोगले. पतीने तिला गरोदरपणात घरातून बाहेर काढले. पण आता ती खूप धाडसी झालीये. टीव्ही मालिकेतून तिने आता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीये. 'बडे अच्छे लगते हैं', 'कुमकुम' या मालिकांमध्ये तिला वेगळी ओळख मिळाली.

अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. ती नेहमीच चर्चेत असते. आता तिचे खूप कौतुक होत आहे आणि आता ती दिसायला खूप सुंदर आहे.

fallbacks

चाहत खन्ना सध्या मालदीवमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या घालवत आहे. तिथे ती सुंदर लोकेशनमधले एकापेक्षा एक हॉट फोटो पोस्ट करत आहे. चाहतने तिचे फोटो इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

fallbacks

ती अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये बिकिनी परिधान करून खूपच हॉट दिसत आहे. सध्या चाहतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच घटस्फोटानंतर ती आणखीनच बोल्ड आणि ग्लॅमरस बनल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ck (@chahattkhanna)

चाहत खन्ना हिला दोन वेळा तलाकचा त्रास सहन करावा लागला आहे. 2013 मध्ये बॉयफ्रेंड फरहान मिर्झासोबत लग्न केले, ती 4 वर्षात दोन मुलांची आई झाली, चाहतचा 2018 मध्ये घटस्फोट झाला. यामागे तिने कारण दिले होते की, तिचा नवरा तिचा छळ करायचा, मारहाण करायचा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ck (@chahattkhanna)

चाहत खन्ना म्हणाली की, फरहान नेहमी माझ्यावर लक्ष ठेवायचा, एका खोलीतून दुसर्‍या खोलीतही माझा पाठलाग करायचा, मला माझ्या दोन मुलांसोबत बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. माझ्या दुसऱ्या प्रसूतीच्या चौथ्या दिवशी त्याने मला घरातून हाकलून दिले.

तिचे पहिले लग्न वयाच्या 20 व्या वर्षी झाले होते, 2006 मध्ये तिने भरत नरसिम्हानियन यांच्याशी लग्न केले आणि हे लग्न केवळ 7 महिने टिकले. रिपोर्टनुसार तो तिला मारहाण आणि छळही करत असे.

Read More