Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pornography Case : 'मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे...' शिल्पाचा आईला मेसेज

पॉर्नोग्राफी प्रकरणाचा राज कुंद्राच्या खासगी जीवनावर परिणाम 

Pornography Case : 'मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे...' शिल्पाचा आईला मेसेज

मुंबई : पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पॉर्नोग्राफी  प्रकरणी रोज नवे खुलासा समोर येत आहेत. राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  पतीच्या अटकेनंतर शिल्पा सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत.  फार कमी लोकांना माहिती आहे की, मध्यंतरी राज आणि शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. 

'मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे...' शिल्पाच्या फोनवरून असा मेसेज तिच्या आईला गेला होता. ज्यामुळे शिल्पाची आईला मोठा धक्का बसला. पण नंतर जेव्हा त्यांना खरी परिस्थिती कळाली तेव्हा त्यांना दिलासा मिळाला. खरं तर तेव्हा शिल्पासोबत एक प्रँक करण्यात आला.  शिल्पासोबत हा प्रँक फिल्ममेकर अनुराग बासूने केला होता. 

राज कुंद्रासोबत आपलं मोठं भांडण झालं असून लवकरचं त्याला घटस्फोट देत आहोत असं शिल्पा शेट्टीने आईला केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. 'सुपर डान्सर 3' मध्ये त्यांनी हा खुलासा केला. असं काही झालं आहे याची कल्पना देखील शिल्पाला नव्हती. पण नंतर गीता कपूरने तिला याबद्दल सांगितलं.

त्यानंतर शिल्पाने आईला फोन केला आणि सर्व काही खरं सांगितलं. 'कधी माझ्या फोनवरून मी प्रेग्नेंट आहे किंवा घटस्फोट घेत आहे, असा मेसेज आला तर समजून जा हा एक प्रँक आहे. कारण अनुराग दादा सेटवर आहे.' 'सुपर डान्सर 3' मध्ये अनुराग बासू, गीता कपूर आणि शिल्पा फार गंमत करायचे. 

Read More