Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी आयुष्यभर एकटेपणाचं ओझं वाहिलं, नवरा असता तर...?' रेखा यांनी पुन्हा लग्न का केलं नाही?

रेखा यांनी त्यांचा आयुष्यात अनेक दुःख सहन केली आहेत. लहानपणापासनूच त्यांना स्वतःसाठी आंनद शोधत राहावा लागला. अशातच त्यांच्या लग्नाच्याही वेदना वेगळ्या आहेत. पाहूयात रेखा यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? 

'मी आयुष्यभर एकटेपणाचं ओझं वाहिलं, नवरा असता तर...?'  रेखा यांनी पुन्हा लग्न का केलं नाही?

Rekha: एक अभिनेत्री, एक आयकॉन आणि एक जिवंत कोडं. रुपेरी पडद्यावर लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री तिच्या खाजगी आयुष्यात मात्र कायमच दुःख आणि एकटेपणाच्या दुःखात राहिली. लहानपणापासून स्वतःसाठी आनंद शोधत आलेल्या रेखा यांना आयुष्यात अनेक फटके बसले. वडिलांचा आधार न मिळणं, अपूर्ण नाती, अल्पकाळ टिकलेलं लग्न आणि नंतरची खंत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचं आयुष्य म्हणजे एका न सुटलेल्या कहाणीसारखे आहे. 'दो अंजाने', 'मुकद्दर का सिकंदर', 'सिलसिला', 'खूबसूरत' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये रेखांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सौंदर्य, अभिनय आणि शाही स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेखा, त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहिल्या.

रेखांचे वैवाहिक आयुष्य आणि त्यामागचं दुःख
रेखा यांचं लग्न 1990 साली दिल्लीतील उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्याशी झालं. मात्र हे नातं एक वर्षही टिकू शकलं नाही. मुकेश यांनी काही महिन्यांतच आत्महत्या केली आणि रेखा पुन्हा एकदा आयुष्यात एकट्याच राहिल्या. समाजाने त्यांना दोष देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या.

आजही रेखा कपाळावर सिंदूर लावतात, जे अनेक प्रश्न निर्माण करतं. लोक विचारतात, रेखांनी पुन्हा लग्न का केलं नाही?

एका मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या मनातील वेदना उघड केल्या. लग्न, मूल आणि नातेसंबंधांबद्दल विचारले असता रेखा म्हणाल्या, 'मला आता कोणालाही गमवायचं नाही.' या एका वाक्यात त्यांनी त्यांच्या दुःखाचं सार सांगितलं. 'माझं लक्ष जर मूलांकडे गेलं असतं, तर मी माझ्या ध्येयांकडे लक्ष देऊ शकले नसते,' असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त प्रेम नव्हे, तर समर्पण होतं.
'मी अशी स्त्री आहे, जी एकदा नात्यात आली की स्वतःला संपूर्णपणे समर्पित करते. मी त्यांचे कपडे निवडेन, जेवण बनवेन, त्यांच्या तब्येतीची काळजी घेईन. पण कदाचित त्यामुळे मी स्वतःला विसरले असते.'

हे ही वाचा: 'माझ्या मॅनेजरला वाटलं मी वेडी झाली आहे,' बिपाशा बासूने पहिल्यांदाच केला धक्कादायक खुलासा, 'लोकांनी मला अ‍ॅडल्ट स्टार...'

आईसारखाच एकटेपणा
रेखा यांच्या आयुष्यात त्यांच्या आईप्रमाणेच एकटेपणाचे क्षण आले. त्यांच्या नात्यांच्या चर्चा अनेकदा झाल्या, अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, अक्षय कुमार यांच्याशी त्यांच्या नावाची जोडली गेली. पण या सर्व नात्यांना शेवट मिळाला नाही.

आज रेखा मुंबईत त्यांच्या विश्वासू सेक्रेटरी फरजाना यांच्यासोबत राहत आहेत. त्या समाजापासून थोड्याफार अंतरावरच राहणं पसंत करतात. त्या क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतात. पण जेव्हा दिसतात, तेव्हा त्यांच्या शाही अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read More