Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी पुरुषासारखी दिसते' बॉलिवूड अभिनेत्रीने पहिल्यांदाच मांडला बॉडी शेमिंगवर भावनिक संघर्ष; 26 इंची कंबर...

आजपर्यंत लोकांनी अर्चना पूरण सिंगला हसताना आणि इतरांना हसवताना पाहिले आहे. अनेकदा लोक तिच्या लूकची आणि हास्याची खिल्ली उडवताना दिसतात, पण यावेळी अभिनेत्रीचे दुःख समोर आले आहे. पाहूयात अर्चना सगळ्यांसमोर काय म्हणाली?

'मी पुरुषासारखी दिसते' बॉलिवूड अभिनेत्रीने पहिल्यांदाच मांडला बॉडी शेमिंगवर भावनिक संघर्ष; 26 इंची कंबर...

Archana Puran Singh: टीव्हीवर लोकांना हसवणारी आणि नेहमी आत्मविश्वासाने वावरणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने नुकताच एक भावनिक आणि मन हेलावणारा अनुभव शेअर केला आहे. लहानपणापासूनच तिच्या दिसण्यावरून झालेल्या टीका, शरीराच्या आकारावर दिले गेलेले अपमानास्पद टोमणे आणि 'पुरुषासारखी' दिसते अशा कमेंट्स- या सगळ्यांचा खोल मानसिक परिणाम तिने मोकळेपणाने व्यक्त केला.

लोकांनी पाहिलं हास्य, पण दिसलं नाही दुःख
दशकांपासून इंडस्ट्रीत असलेल्या अर्चनाने अनेक सिनेमे आणि टीव्ही शोमध्ये काम केलं. मात्र 'द कपिल शर्मा शो'मधील जज म्हणून ती घराघरात पोहचली. शोमध्ये तिच्या हास्याची, हावभावांची आणि लूकची सातत्याने थट्टा केली गेली. ती त्या गोष्टी हसत हसत घेत होती, पण आतून ती कशी कुरतडली जात होती हे तिच्या अलीकडील कबुलीजबाबातून स्पष्ट होतं.

यूट्यूब व्लॉगमध्ये व्यक्त केलं दुःख
तिने अलीकडेच आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्लॉगमध्ये अभिनेत्री आणि फिटनेस एनथुजियास्ट अंशुला कपूरसोबत संवाद साधला. या संवादात त्यांनी बॉडी शेमिंग, महिला शरीराविषयी समाजाच्या चुकीच्या धारणा आणि स्वतःच्या असुरक्षिततेबद्दल उघडपणे चर्चा केली. अर्चना म्हणाली, '26 इंची कंबर असूनसुद्धा मला नेहमी जाड वाटायचं, कारण समाजाने मला तसं भासवलं.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बॉडी शेमिंग
फक्त अर्चना नव्हे, तर अनेक महिला आणि सेलिब्रिटी बॉडी शेमिंगच्या बळी ठरतात. सोशल मीडियावरील ट्रोलिंग, नको असलेली तुलना आणि इन्स्टाग्राम स्टँडर्ड-या सगळ्यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अर्चना आणि अंशुलाने या अनुभवांमधून बाहेर पडण्याचा मार्ग 'स्वतःला स्वीकारणं' आणि 'फिटनेस हे आरोग्यासाठी असावं, सौंदर्यासाठी नाही' हे सांगण्याचा प्रयत्न केला.

ट्रोलिंगला दिलं प्रत्युत्तर
एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करत म्हटलं की ती 'स्त्रीपेक्षा पुरुषासारखी दिसते.' या कमेंटवर तिने संयम राखून उत्तर दिलं. मात्र, नंतर तिने एका मुलाखतीत म्हटलं की अशा कमेंट्स दुर्लक्षित करणं कठीण असतं, पण त्या ट्रोलर्सचं उद्दिष्ट फक्त लक्ष वेधणं असतं. 'जर सर्व कलाकार एकत्र येऊन अशा ट्रोलिंगला प्रत्युत्तर देऊ लागले, तर समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढेल आणि एक सकारात्मक बदल घडू शकतो,' असं ती म्हणाली.

हे ही वाचा: 'हे लग्न आहे की फॅशन शो?' आलियाचा लूक पाहून चाहते घायाळ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

महिलांवरील सौंदर्याच्या अपेक्षा
अर्चनाच्या अनुभवातून हे स्पष्ट होतं की महिलांकडून समाज अनेक अपेक्षा ठेवतो. 'बारीक असावं, सुंदर असावं, वय लपवावं, हसणं आवाजात नको, कपडे पद्धतशीर असावेत'- या सगळ्या अपेक्षांच्या भाराखाली महिला दबल्या जातात. अर्चना पूरण सिंगसारख्या प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा त्यांचं दुःख शेअर करतात, तेव्हा इतर अनेक महिलांना आधार मिळतो.

अर्चनाला जरी अनेकदा टीकेचा सामना करावा लागला, तरी तिने आपली ओळख कायम ठेवली आहे. हसरी, आत्मविश्वासू आणि बिनधास्त. तिचं प्रामाणिक बोलणं आणि अनुभव शेअर करणं इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Read More