Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी आयुष्यात खूप वाईट काळातून गेलो' अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा धक्कादायक खुलासा

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. आता अगस्त्य त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

'मी आयुष्यात खूप वाईट काळातून गेलो' अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा धक्कादायक खुलासा

मुंबई : जितके चर्चेत स्टार्स असतात तितकेच चर्चेत स्टार किड्सही असतात. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.  नुकताच अगस्त्यचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र हा सिनेमा फारसा चालला नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अगस्त्य नंदा याने बॉलिवूडमध्ये पर्दापण केल्यापासून तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत आलाय. नुकतीच अगस्त्यने दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा हिचा मुलगा आहे.  

अगस्त्य आणि त्याची आजी जया बच्चन नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळी अगस्त्यने या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे केले. याचबरोबर अगस्त्य त्याच्या मेंटल हेल्थवरही बोलताना दिसला. त्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहेत. अगस्त्यने यावेळी त्याच्या मेंटल हेल्थवर केलेलं वक्तवव्य खूपच चर्चेत आहे. आयुष्यात किती जास्त वाईट स्थितीतून आपण गेलो हे सांगताना अगस्त्य भावूक होताना दिसला.

दिलेल्या मुलाखतीत अगस्त्य म्हणाला, ''मी खूप जास्त गंभीर एंजायटीमधून गेलो आहे. मला यामधून निघण्यासाठी धर्म आणि आध्यात्मने मदत केली. मी आयुष्यात खूप जास्त वाईट काळातून गेलो आहे. मेडिटेशनमुळे मला खूप जास्त मदत मिळाली आहे. मेडिटेशनमुळे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाल्याचंही अगस्त्य यावेळी म्हणाला.''  
 
दिलेल्या मुलाखतीत अगस्त्य म्हणाला, आपण एका अशा जगात जगतो जिथे सगळंकाही सुरू आहे. त्यावेळी तुम्ही अशी एखादी गोष्ट करता जी जमिनीसोबत जोडली गेलेली असते. आपल्याला एक सवय आहे की, आपल्याला प्रत्येक गोष्ट एकदम झटक्यात मिळाली पाहिजे. आपण धैर्य आणि विश्वास दोन्ही गोष्टी सोडून दिल्या आहेत. मला माहितीये की, तुम्ही लोकं हे माझ्यावर हसत आहात.

मी एक धार्मिक आणि आधात्मिक आहे आणि हे सर्व माझ्यासोबत आपोआप होत गेलय. यामुळे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला मिळतो आणि तुम्ही कंट्रोलच्या बाहेर जातात.'' असं वक्तव्य बीग बींचा नातू अगस्त्य नंदा याने दिलेल्या मुलाखती मध्ये केलं आहे. त्याच्या या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा  होताना दिसत आहे. 

अगस्त्य अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपुर्वी त्याचा आणि शाहरुखची लेक सुहाना खानसोबत एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो तिला कार पर्यंत सोडायला जातो. त्याचा हा व्हिडीओ समोर येताच त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी जोर धरला होता. याशिवाय हे दोघं अनेकदा एकत्रही दिसले आहेत.''

Read More