Marathi News> मनोरंजन
Advertisement

जर अक्षय कुमारने तो निर्णय घेतला नसता, तर अजय देवगणचं करिअर 30 वर्षांपूर्वीच संपले असते!

अजय देवगणने 'रेड 2' चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, एक काळ असा आला होता की अजय देवगणचे करिअर संपण्याच्या उंबरठ्यावर होते? त्याच वेळी अक्षय कुमारच्या घेतलेल्या निर्णयामुळे अजयचं करिअर वाचलं.   

जर अक्षय कुमारने तो निर्णय घेतला नसता, तर अजय देवगणचं करिअर 30 वर्षांपूर्वीच संपले असते!

Ajay Devgan's Career: अजय देवगण आणि अक्षय कुमार यांची मैत्री अनेक काळापासून घट्ट आहे. दोघांनीही जवळपास एकाच काळात आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली आणि पुढे एकत्र काही गाजलेले चित्रपट दिले. मात्र, 30 वर्षांपूर्वी अक्षय कुमारने घेतलेल्या एका निर्णयामुळे अजय देवगणचे करिअर वाचले, नाही तर त्याला यश मिळालचं नसतं असे म्हणता येईल. कारण, त्या काळात अजयचे चित्रपट सलग फ्लॉप होत होते.

अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचे करिअर जवळजवळ सारख्याच गतीने पुढे गेले आहे. अक्षय दरवर्षी 3-4 चित्रपट घेऊन येतो आणि अजयदेखील तितक्याच जोमात दरवर्षी आपले चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. दोघांचेही काम करण्याची पद्धत ठराविक आहे आणि त्यांनी अनेकदा एकत्र सिनेमे केले आहेत. अजय देवगण आणि अक्षय कुमार दोघांनी 1991 मध्ये आपली सिनेमाची कारकीर्द सुरू केली. त्यांचा अलीकडील एकत्र चित्रपट 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई करु शकला नाही. मात्र, तीन दशके मागे जाऊन पाहिले तर, अक्षय कुमारने घेतलेल्या एका निर्णयामुळे अजय देवगणला मोठा फायदा झाला आणि त्याचे नशीबच बदलले.

1991 मध्ये अजयने 'फूल और कांटे' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटाने चांगली कमाई केली. प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. पुढच्या वर्षी म्हणजे 1992 मध्ये त्याचा दुसरा चित्रपट 'जिगर' प्रदर्शित झाला आणि तोही यशस्वी ठरला. पहिल्या दोन यशस्वी चित्रपटांमुळे अजय देवगणने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करायला सुरुवात केली होती, पण 1993 मध्ये त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप झाले आणि त्याचे करिअर संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र, 1994 मध्ये अजयच्या हातात असा एक चित्रपट आला ज्याने त्याला पुन्हा स्टार बनवले. तो चित्रपट म्हणजे 'दिलवाले'. विशेष म्हणजे हा चित्रपट अजयला अक्षय कुमारने नकार दिल्यामुळे मिळाला.

 हे ही वाचा: 'या' अभिनेत्रींच्या टॅटूमधून उलगडते त्यांचा आयुष्याचे पान; 7 व्या क्रमांकावर असणाऱ्या अभिनेत्रीचा टॅटू आहे खास 

'दिलवाले' चित्रपट प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अजय देवगणसोबतच सुनील शेट्टी आणि रवीना टंडन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. हा रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. याच चित्रपटामुळे अजयसोबतच सुनील शेट्टीचेही नशीब उजळले.

या चित्रपटातील पटकथा आणि गाणी दोन्हीही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आणि आजही हा चित्रपट लोक आवडीने पाहतात. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती अक्षय कुमार होता. मात्र, त्याकडे त्यावेळी तारखा नसल्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली आणि त्याचा फायदा अजय देवगणला झाला.

Read More