Shreya Ghoshal nad Shah Rukh Khan Video : राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच आपल्याला सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी दिसले. त्याचं कारण म्हणजे IIFA Awards 2025 होता. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9 मार्च रोजी रात्री संपला. या दरम्यान, अनेक सगळेच कलाकार तिथे दिसले. यावेळी कार्यक्रमात सगळ्यात सुंदर आवाजाचा पुरस्कार हा श्रेया घोषालला मिळाला. ते पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता आणि सगळेच तिचं कौतूक करत आहेत. मात्र, या सगळ्यात श्रेयानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओची सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हा श्रेयाला भेटतो आणि मिठी मारून तिला बेटा कशी आहेस असं विचारतो. नेमकं काय झालं ते पाहुया...
श्रेया घोषालनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी हे शाहरुखचे फोटो काढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे श्रेया ही एका ठिकाणी उभी राहून त्याच्याकडे बघताना दिसते. त्यानंतर शाहरुख हा श्रेयाच्या दिशेनं येतो. श्रेयाला मिठी मारतो. श्रेयानं हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत श्रेयानं कॅप्शन दिलं की "माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण. त्याच्या नम्रतेचं आणि प्रेमाचं नेहमीच कौतुक होतं, मेगा स्टार शाहरुखवर सगळे याच कारणासाठी प्रेम करतात. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर त्यानं मला मिठी मारली आणि आशीर्वाद देत म्हणाला, बेटा तू कशी आहेस. ही माझी सगळ्यात चांगली आठवण राहिल. माझ्या करिअरची सुरुवात ही 23 वर्षांपूर्वी त्याच्या देवदास या चित्रपटापासून झाली. राजस्थानमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्या ठिकाणी मी लहाणाचे मोठे झाले आज 25 वर्षांनी हे संपूर्ण झालं आहे असं म्हणता येईल. देवाचे, माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि माझ्या चाहत्यांचे आभार."
यंदाच्या आयफा 2025 पुरस्कार सोहळ्यात श्रेया घोषालनं सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार तिला 'भूलभुलैया 3' या चित्रपटातील 'आमी जे तोमार 3.0' या गाण्यासाठी मिळाला होता.
हेही वाचा : पुन्हा एकदा पाहता येणार आर्ची -परश्याची 'सैराट' लव्ह स्टोरी; 'या' दिवशी होणार Re-release
श्रेया घोषालनं सगळ्यात पहिलं कोणतं बॉलिवूड गाणं रेकॉर्ड केलं असेल तर ते देवदास या चित्रपटातील बैरी प्रिया हे आहे. या चित्रपटातच शाहरुखची हटके भूमिका होती. ज्यावेळी श्रेयानं हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा ती 16 वर्षांची होती आणि तिनं हे गाणं उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं होतं.