Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aai Kuthe Kaay Karte: अरुंधतीच्या भूतकाळातील जवळच्या व्यक्तीची अचानक एन्ट्री !

स्मॉल स्क्रिनवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या अतिशय वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

   Aai Kuthe Kaay Karte: अरुंधतीच्या भूतकाळातील जवळच्या व्यक्तीची अचानक एन्ट्री !

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या अतिशय वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. अविनाशला पैशांची मदत करण्यासाठी अरुंधतीने समृद्धी बंगला गहाण ठेवला आहे. ही गोष्ट देशमुख कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येकाकडूनच उलट सुलट प्रतिक्रिया मिळाल्या. 

अनिरुद्ध आणि संजनाने तर समृद्धी बंगला विकण्यासाठीचाच प्रस्ताव मांडला. मात्र या कठीण प्रसंगातही खचून न जाता अरुंधतीने ठामपणे उभं रहायचं ठरवलं आहे. घरात एकीकडे तणावाचं वातावरण असताना मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. आशुतोष असं या नव्या पात्राचं नाव असून अभिनेता ओंकार गोवर्धन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन आहे. बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोषची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होणार आहे.

अभिनेता ओंकार गोवर्धन आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूपच उत्सुक असून आई कुठे काय करते कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. 'आई कुठे काय करते' ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं आहे.

fallbacks

त्यामुळे आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी जबाबदारीचं आणि तितकंच आव्हानात्मक आहे. हे पात्रं मला अतिशय आवडलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर माझी आई कुठे काय करते मालिकेत एण्ट्री होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे असं ओंकारने सांगितलं.

Read More