Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC 13: बिग बींनी हातात घेतला नीरजचा भाला, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...

ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 13' या शोच्या आगामी भागात दिसतील. 

KBC 13: बिग बींनी हातात घेतला नीरजचा भाला, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...

मुंबई : ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 13' या शोच्या आगामी भागात दिसतील. या एपिसोडचा टीझर इंटरनेटवर व्हायरल झाला आहे कारण ही जोडी हॉट सीटवर असूनही अनुभवी अभिनेत्यासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. आगामी भागाच्या एका टीझरने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे, जिथे प्रेक्षकांनी खेळ आणि बॉलिवूड यांच्यात एक अद्भुत जुगलबंदी पाहिली. यादरम्यान नीरज चोप्रा अमिताभ बच्चन यांना भाला फेकण्याच्या काही टिप्स देताना दिसला. तो भाला प्रभावीपणे कसा फेकावा हे बिग बींना सांगत होता.

सोनी वाहिनीने हा टीझर ट्विटरवर नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेशच्या एपिसोडसह शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी हटके कॅप्शन देखील दिलं आहे.

नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेशच्या या मजेदार भागात देशातील दोन मोठे खेळाडू दिसतील. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अमिताभ बच्चन यांनी हॉकी स्टिक आणि भाला काढला. त्यानंतर त्यांनी खेळाडूंना त्यांचा खेळ शिकण्यासाठी काही टिप्स सांगण्यास सांगितले.

ऑलिम्पिक पदक विजेता 23 वर्षीय नीरज चोप्राने भाला फेकण्यासाठी वापरलेल्या तीन वेगवेगळ्या पकड दाखवल्या आणि बिग बींना त्याची आवडती पकड देखील दाखवली. यानंतर नीरज चोप्रा अमिताभ बच्चन यांना म्हणाला, "मी ते फेकून तुम्हाला दाखवले असते पण ..." त्यावर अमिताभ बच्चन लगेच म्हणाले, "सर, हे करू नका सर ..." यानंतर संपूर्ण स्टुडिओमध्ये जोरदार हशा पिकला .

Read More