Marathi News> मनोरंजन
Advertisement

'नोटबुक' सिनेमात सलमान गाणार रोमँटिक गाणं

सलमान खान नेहमीच अनेकांचा गॉडफादर राहिला आहे. 'नोटबुक' सिनेमात सलमानने नवीन कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आहेत.

'नोटबुक' सिनेमात सलमान गाणार रोमँटिक गाणं

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याचे पडसाद जनसामान्यांपासून ते बॉलिवूडपर्यंत उमटलेले दिसून आले. या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्यात आले होते. सलमान खानने पाकिस्तानी कलाकार अतिफ असलमला 'नोटबुक' सिनेमातून बेदखल करत. आपल्या प्रोडक्शन टीमला गाण्याचे पुन्हा नव्याने रेकॉर्डिंग करण्यास सांगितले होते. तर आता अभिनेता सलमान खानच्या प्रोडक्शनखाली तयार होत असलेल्या 'नोटबुक' सिनेमाचे एक रोमॅंटिक गाणे खुद्द सलमानच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात येणार आहे.

fallbacks

सलमान खान नेहमीच अनेकांचा गॉडफादर राहिला आहे. 'नोटबुक' सिनेमात सलमानने नवीन कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आहेत. अभिनेता मनिष बहलची मुलगी प्रनूतन बहल 'नोटबुक' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिनेमात प्रनूतन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात झहीर इक्बाल सुद्धा डेब्यू करणार आहे. सलमान खानच्या प्रोडक्शनखाली तयार होत असणारा 'नोटबुक' सिनेमा २९ मार्च रोजी सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे.  

अली अब्बाज झाफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहात दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे सलमान खानचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'दबंग 3' लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. महत्तवाचे म्हणजे 'हम दिल दे चूके  सनम' सिनेमानंतर दिग्दर्शक संजय लिला भंन्साळी आणि सलमान पुन्हा एकत्र येणार आहे. सिनेमातील सलमान-एश्वर्या जो़डीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. 

Read More