Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : शहिद जवानाच्या बहिणीच्या भूमिकेत सपना

हरियाणातील डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये सपना एका जवानाच्या बहिणीच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

VIDEO : शहिद जवानाच्या बहिणीच्या भूमिकेत सपना

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. सोशल मीडिच्या माध्यमातून ते आपले मत व्यक्त करत आहेत. हरियाणातील डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये सपना एका जवानाच्या बहिणीच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. भारतीय वायुसेने कडून झालेल्या हल्ल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सपनाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. 

 

या व्हिडीओमधील गाणे गायक अंशु मोरखी यांनी गायले असून सपना आणि अभिनेता सुरेंद्र काला मुख्य भूमिकेत दिसत आहेत. याआधी सपनाने 'दोस्ती के साइड इफेक्ट्स' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही विशेष गाजला नाही. पण सपनाच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाले.

या व्हिडीओमध्ये सपना लाल रंगाच्या साडी मध्ये तिच्या शहिद भावाच्या चिते समोर उभी असलेली दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी सपना तिच्या मुलाला मामा सारखीच कामगिरी करण्यास सांगते. हा व्हिडीओ देशातील प्रत्येक नागरिकांला प्रेरित करणारा आहे. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर वायुदलाने १००० किलोची स्फोटकांसहीत हल्ला केला. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. भारतीय वायूदलाच्या १२ 'मिरज २०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळं उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याच्या काही तासांनंतरच भारतीय सीमेजवळ तुफान गोळीबार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराचे भारताकडून ही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Read More