Marathi News> मनोरंजन
Advertisement

EXCLUSIVE : स्वीटूच्या आयुष्यात अखेर तो क्षण आलाच...

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांची स्मॉल स्क्रिनवरील लोकप्रिय मालिका बनली आहे. 

EXCLUSIVE : स्वीटूच्या आयुष्यात अखेर तो क्षण आलाच...

मुंबई : 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांची स्मॉल स्क्रिनवरील लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्वीटू आणि ओम या मालिकेतील प्रमुख पात्र असून त्याचं सोशल मीडियावर देखील मोठं फॅन फॉलोविंग आहे. 

आता या मालिकेत प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वीटू आणि ओमच लग्न पार पडणार आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे.

ओम आणि स्वीटू खूप खुश आहेत कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत. कोकणच्या मातीत रंगलेला हा ओम आणि स्वीटूचा लग्नासोहळा हे या १ तासाच्या विशेष भागाचं खास आकर्षण असणार आहे. हा भाग प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार असून सोशल मीडियावर देखील काही फोटो व्हायरल होत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या लग्नसोहळाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. शाही विवाहसोहळा लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Read More