Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नमंडपात कोणला पाहून स्वीटूला बसला धक्का?

नुकताच या लग्नातील एक प्रोमो समोर आला आहे. ज्या स्वीटू अगदी सुंदर पारंपारिक अंदाजात नटली आहे. 

लग्नमंडपात कोणला पाहून स्वीटूला बसला धक्का?

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. स्वीटू- ओमची केमिस्ट्री प्रेक्षक चांगलेच एन्जॉय करत आहेत.

या मालिकेत सुरु असलेलं प्रत्येक वळणं प्रेक्षक जवळून अनुभवत आहेत. अशाच आता या मालिकेत ओम-स्वीटू विवाहगाठ बांधण्यासाठी तयार आहेत. स्वीटूच्या आईने अखेर दोघांच्या लग्नाला होकार दिला आहे. 

नुकताच या लग्नातील एक प्रोमो समोर आला आहे. ज्या स्वीटू अगदी सुंदर पारंपारिक अंदाजात नटली आहे. तर ओमला मात्र अद्याप रिवील करण्यात आलेलं नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यातच या प्रोमोमध्ये एका व्यक्तीला पाहून स्वीटूच्या चेहऱ्यावरचा रंग उडला आहे. तिला धक्का बसला आहे. त्यामुऴे आता या लग्नात काही विघ्न येतंय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

Read More