Virat Anushka Romantic Photos: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. विराट अनुष्काचे फोटो दिसताच काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा तोच प्रकार घडत आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये विराट अनुष्का एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या सेल्फीमध्ये दोघेही जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत पोज देताना दिसत आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विराट आणि अनुष्का त्यांच्या धकाधकीच्या व्यावसायिक आयुष्यात एकमेकांसोबत कौटुंबिक वेळ घालवतात.
Unseen #Virushka
— VK_Viratians (@imviratarmy) September 2, 2022
In this tweet thread #ViratKohli #AnushkaSharma #Viratians pic.twitter.com/V1rtfGraZf
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची प्रेमकहाणी बरीच हिट आहे. विराट कोहली अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनुष्कासोबतचे फोटो शेअर करत असतो. अलीकडेच विराट कोहलीने अनुष्का शर्माचा हा फोटो शेअर करताना प्रेम व्यक्त केले होते.