Marathi News> मनोरंजन
Advertisement

रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच पवनदीप राजन जिंकल्यानंतर स्टेजवर असं काहीतरी घडणं, या साऱ्याला आणखी वाव देणारं ठरलं...

स्पर्धक पवनदीप राजन या सीझनचा विजेता ठरला. 

रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच पवनदीप राजन जिंकल्यानंतर स्टेजवर असं काहीतरी घडणं, या साऱ्याला आणखी वाव देणारं ठरलं...

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 12' 8 महिन्यांच्या प्रवासानंतर 15 ऑगस्ट रोजी नुकताच संपला. स्पर्धक पवनदीप राजन या सीझनचा विजेता ठरला. आणि अरुणिता कांजीलाल दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. याचबरोबर सायली कांबळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि षण्मुखप्रिया आहेत. विजेत्यांच्या घोषणेनंतर पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांनी एकमेकांना आनंदाने घट्ट मिठी मारली. या विजयासाठी दोघांनीही एकमेकांचं अभिनंदन केलं. जर तुम्ही हे पाहायला चुकला असाल तर काही हरकत नाही, आज आम्ही तुम्हाला या दोघांच्या खास क्षणाचे सुंदर फोटो दाखवणार आहोत.

पवनदीप ठरला विजेता
पवनदीप राजनने 'इंडियन आयडॉल सीझन 12' ची ट्रॉफी जिंकली आहे. 'द ग्रेटेस्ट फिनाले एव्हर' मध्ये विजेता घोषित झाल्यानंतर त्याला 25 लाख रुपयांचा धनादेश आणि बक्षीस म्हणून मारुती सुझुकी स्विफ्ट डीझायर मिळाली आहे. तर त्याची सह-स्पर्धक अरुणिता कांजिला फर्स्ट रनरअप तर सायली कांबळे सेकंड रनर अप ठरली. निर्मात्यांनी दोघांना 5 लाख रुपयांचा धनादेश म्हणून सन्मानित केलं.

fallbacks

पवनदीपने जिंकली चाहत्यांची मने 
'इंडियन आयडॉल 12' चा विजेता पवनदीप राजनने शोच्या स्टेजवर शेवटचे परफॉर्म सादर केले. ते म्हणजे त्याने गिटार वाजवून आपल्या कामगिरीची सुरुवात केली आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर फिल्म 'केदारनाथ' मधील 'काफिराना' हे गाणे गायलं. यानंतर, त्याने 'हवाएं', 'नादान परिंदे' आणि 'सदा हक' सारखी गाणी गाऊन चाहत्यांची मने जिंकली.

Read More