Marathi News> मनोरंजन
Advertisement

indian idol 12 : अरुणितासोबत पवनदिपला कारायची आहे ही खास गोष्ट

  'इंडियन आयडॉल 12' या सिंगींग रिएलिटी शोचा अलीकडेच शेवट झाला

indian idol 12 : अरुणितासोबत पवनदिपला कारायची आहे ही खास गोष्ट

मुंबई : 'इंडियन आयडॉल 12' या सिंगींग रिअॅलिटी शोचा अलीकडेच शेवट झाला, ज्यात विजेता म्हणून पवनदीप राजनचं नाव समोर आलं. त्याचवेळी, शोची प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल ठरली, त्यानंतर सायली कांबळे तिसऱ्या क्रमांकावर आणि मोहम्मद दानिश चौथ्या स्थानावर होता

शोचा विजेता पवनदीपला 25 लाख रुपये रक्कम आणि मारुती स्विफ्ट कार मिळाली बक्षिस म्हणून मिळाली. इंडियन आयडॉल दरम्यान, पवनदीप आणि अरुणिताच्या नात्याचाही बऱ्याच चार्चा समोर आल्या. शोनंतर पवनदीप सतत मीडियामध्ये मुलाखती देताना दिसत आहे.

त्याचवेळी, अलीकडेच त्याच्या एका मुलाखतीत, पवनदीपने सांगितलं की, त्याला अरुणितासोबत रोड ट्रिपला जायचं आहे. एवढंच नाही तर या शोमध्ये बाकीच्या स्पर्धकांनाही या ट्रिपमध्ये घेण्याचा त्याचा विचार आहे. पवनदीप म्हणाला की, तो आधी त्याच्या 6 मित्रांसोबत केदारनाथला जाईल, त्यानंतर तो घरी जाईल आणि त्याच्या पालकांसोबत वेळ घालवेल.

यानंतर, तो मुंबईत येऊन घर घेऊन त्याच्या शोच्या बाकी स्पर्धकांसोबत राहण्याचाही विचार करत आहे. शो जिंकल्याबद्दल, पवनदीपने त्यांचे हात जोडूनआभार मानले ज्यांनी पवनदिपला वोट केलं. पवनदीपला बक्षिस मिळालेल्या पैशांमधून जिल्ह्यात एक संगीत शाळा उघडायची आहे. जेणेकरून तेथील मुलांना चांगलं संगीत शिक्षण मिळेल आणि ते आयुष्यात या क्षेत्रात पुढे जाऊ शकतील.

Read More